राज्याच्या राजकारणातून दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या 94 वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.
शालिनी पाटलांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताईंना ओळखले जात होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काॅग्रेस ची महाराष्ट्राची धूरा ताईंवर सोपवली होती स्व.यशवंतराव चव्हाणही ताईंना आदराने मान द्यायचे. शालिनी पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील कोरेगावात अंत्यसंस्कार होणार आहेत. शालिनी पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
शालिनीताई या वसंतदादाच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. त्या मागील काही दिवसापासुन आजारी होत्या. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी शालिनीताईंनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी आणि आक्रमक अशी ओळख निर्माण केली होती. शालिनीताई पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. त्यावेळी 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
शालिनीताईंची दखलपात्र अशी राजकीय कारकीर्द
शालिनीताई पाटील या राज्यातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. शालिनीताईंचं राजकीय आणि सामाजिक कार्य मोठं असून त्या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. शालिनीताईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह केल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच पुढे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या आमदार देखील होत्या.
शालिनीताई यांनी १९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. महसूल मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं. १९८१ मध्ये अंतुले यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, जो त्यावेळच्या राजकारणातील एक मोठा भूकंप मानला जात होता. त्यानंतर साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघात १९९९ ते २००९ च्या काळात त्या आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. तसंच, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीत त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी महिलांसाठी अनेक सहकारी संस्था आणि बचत गटांना प्रोत्साहन दिलं.





