New Year 2026 : 2025 हे वर्ष संपण्याच्या दिशेने आला असून सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि आनंदी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन वर्षात घरातील काही वस्तू बाहेर काढणे महत्त्वाचे आहे कारण या वस्तूंमुळे घरातील प्रगती रखडते. या वस्तू नेमक्या आहेत तरी कोणत्या ते आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
फाटके बूट
वास्तुशास्त्रानुसार, फाटलेले किंवा तुटलेले बूट प्रगतीमध्ये अडथळा आणतात. घरात फटके बोट ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि नवीन वर्षाच्या शुभ कार्यांवर परिणाम करू शकते. म्हणून, २०२६ वर्ष सुरू होण्यापूर्वीच तुमच्या घरातील फाटके बुट किंवा चप्पल काढून टाका.
बंद पडलेले घड्याळ New Year 2026
तुमच्या घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नका… कारण जे घड्याळ थांबलेले असते किंवा जात वेळ दाखवत नाही ते स्थिर उर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात थांबलेले घड्याळ संधींच्या स्थिरतेचे आणि वेळेच्या स्थिरतेचे संकेत देऊ शकतात. वास्तु तज्ञ सांगतात की नवीन वर्षाच्या आधी अशा घड्याळांची दुरुस्ती करावी किंवा घरातून काढून टाकावी जेणेकरून उर्जेचा प्रवाह सुरळीत होईल.
खराब झालेल्या वस्तू
घरातील खराब झालेल्या वस्तू, जसे की तुटलेली सजावट, जुने केलेले फोटो, जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा न वापरलेल्या वस्तू देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे घरात चुकीचं वातावरण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे येणाऱ्या वर्षाच्या शुभतेवर परिणाम होतो. म्हणून, वास्तुशास्त्र या वस्तू काढून टाकणे अत्यंत महत्वाचे मानते. New Year 2026
वाळलेली झाडे
वाळलेली झाडे, पाने किंवा फांद्या घरात किंवा आजूबाजूला ठेवू नयेत कारण ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. अशा झाडांमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक कल्याणावर नकारात्मक परिणाम होतो आणि बुरशी आणि रोग देखील पसरू शकतात.
तुटलेल्या मूर्ती
तुटलेल्या मूर्तीचे आदराने विसर्जन करणे कधीही योग्य आहे. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या मूर्ती उर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात. वास्तुशास्त्रानुसार, गोंधळ मानसिक ताण वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी करतो. नवीन वर्षाच्या आधी घर स्वच्छ करणे आणि कोणत्याही दोषपूर्ण वस्तू काढून टाकणे महत्वाचे आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





