MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Vastu Tips : मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? काय आहे संकेत…

Published:
वास्तू शास्त्रानुसार, जर तुमच्या घरी मांजर येऊन जर तिने पिल्लांना जन्म दिला तर ते फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, पिल्लांच्या जन्माच्या 90 दिवसांच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
Vastu Tips : मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? काय आहे संकेत…

अनेकांना घरात पाळीव प्राणी ठेवण्याची आवड असते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, घरात काही प्राण्यांचं अस्तित्व अशुभ मानलं जातं, तर काहींचं शुभ. असंच काहीसं मांजरींबाबत देखील आहे. मांजरीने घरात पिल्लांना जन्म दिला तर याचा अर्थ काय? याबद्दल जाणून घेऊयात…

मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ?

वास्तुशास्त्रानुसार, घरात मांजरीने पिल्लांना जन्म देणे अत्यंत शुभ मानले जाते. हे घरात सकारात्मक ऊर्जा, धनलाभ आणि प्रगतीचे संकेत देते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांना यश मिळते, असे मानले जाते.

आर्थिक समृद्धी

घरात मांजरीने पिल्लांना जन्म देणे हे घरात धनवृद्धी आणि संपत्तीचे मार्ग उघडण्याचे संकेत आहे. कुटुंबातील सदस्यांना सर्व क्षेत्रांत यश मिळते. घरात सोनेरी मांजरीने पिल्लांना जन्म देणे हे धनलाभ आणि अडलेली कामे पूर्ण होण्याचे लक्षण मानले जाते.

सकारात्मक ऊर्जा

घरात मांजरीने पिल्लांना जन्मदिल्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.

वाईट शक्तींपासून संरक्षण

वाईट शक्ती घरात राहत नाहीत, असेही मानले जाते. घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिल्याने वाईट शक्ती दूर राहतात, असे म्हटले जाते. मांजरीने घरात पिल्लांना जन्म देणे हे सौभाग्य,धन आणि वाईट शक्तींपासून संरक्षणाचे लक्षण मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)