MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

BMC Election 2026 : BMC साठी भाजप – शिंदे गटात 150 जागांवर एकमत!! या 77 जागांवर तिढा

Published:
मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५० जागांवर भाजप-शिवसेनेचे एकमत झालं आहे. बाकीच्या राहिलेल्या ७७ जागांवर पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये पार पडेल
BMC Election 2026 : BMC साठी भाजप – शिंदे गटात 150 जागांवर एकमत!! या 77 जागांवर तिढा

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई महापालिकेपुरते महायुतीतून आऊट केल्यामुळे एकूण 227 जागा असलेल्या मुंबईत जास्तीत जास्त जागा आपल्याकडे असाव्या यासाठी भाजप आणि शिंदे गट आग्रही आहे. यास पार्श्वभूमीवर आज दोन्ही पक्षाच्या बैठकीनंतर 150 जागांवर दोन्ही बाजूने एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.

काय म्हणाले अमित साटम? BMC Election 2026

अमित साटम म्हणाले, मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५० जागांवर भाजप-शिवसेनेचे एकमत झालं आहे. बाकीच्या राहिलेल्या ७७ जागांवर पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल असे अमित साटम यांनी म्हटले. १५० पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईत आमचा महापौर आम्ही बसवू.  ज्या लोकांनी मुंबईत पालिकेत २५ वर्षे भ्रष्टाचार करुन मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे राजकीय अस्तित्व जिवंत करण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत,” असं  म्हणत अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. BMC Election 2026

कमळ आणि धनुष्यबाण एकच

यावेळी अमित साटम यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कमळ आणि धनुष्यबाण एकच आहे असं विधान अमित साटम यांनी केलं. आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की, एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो, दीपोत्सवाला एकत्र दिसलो किंवा रक्षाबंधनाला जातो हा मुद्दा नाहीये. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत राजकारण करणारे नाहीत,” असाही टोला अमित साटम यांनी लगावला.