BMC Election 2026 : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. खास करून मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदे गट मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित आहे मात्र दुसरीकडे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्यासाठी मुंबई भाजपचे नेते काही तयार नाहीत. अशा वेळेस शक्य झालं तर महायुती सोबत…. आणि शक्य नसेल तर महायुती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली असल्याचे बोलले जाते.
आजच्या बैठकीत काय ठरलं? BMC Election 2026
आज मुंबईत निवडणूक निर्णय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली .या बैठकीत सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर चिंतन करण्यात आले. मुंबईत कमीत कमी 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. अशावेळी महायुतीत राहून निवडणुका लढवायच्या की स्वतंत्र लढायचे हा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
भाजप शिंदे गटाचे जागावाटप ठरलं??
दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election 2026) भाजप आणि शिंदे गट युतीच्या माध्यमातून लढवणार हे जवळपास निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. याबाबत पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. परंतु आजच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत 142 जागांता तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा देण्याचं ठरलं आहे. पण अद्यापही 85 जागांचा तिढा निकाली लागलेला नाही.





