MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Astro Tips : चुकूनही ‘या’ वस्तू भेट म्हणून कोणालाही देऊ नका; काय सांगत वास्तुशास्त्र जाणून घ्या..

Published:
आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप विशेष महत्त्व असते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या गिफ्ट देणे शुभ मानले जात नाही. जाणून घ्या..
Astro Tips : चुकूनही ‘या’ वस्तू भेट म्हणून कोणालाही देऊ नका; काय सांगत वास्तुशास्त्र जाणून घ्या..

वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या भेटवस्तू किंवा गिफ्ट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. जर तुम्ही चुकूनही या गोष्टी भेट म्हणून दिल्या तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, या वस्तू देण्याने तुमच्या आयुष्यातील सुख-समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून भेटवस्तू निवडताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

घड्याळ

घड्याळ वेळ आणि प्रगतीचे प्रतीक असल्याने, घड्याळ भेट देणे म्हणजे दुसऱ्याला आपले शुभ दिवस देणे मानले जाते, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर येऊ शकते आणि प्रगती खुंटू शकते.

काळे कपडे

वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही कोणालाही काळे कपडे भेट देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार, या रंगाचे कपडे भेट म्हणून दिल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.  काळ्या रंगाचे कपडे किंवा इतर वस्तू भेट देणे टाळावे, कारण हा रंग नकारात्मकतेशी जोडलेला आहे. 

बूट किंवा चप्पल

वास्तुशास्त्रानुसार, बूट किंवा चप्पल गिफ्ट म्हणून देणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो, गैरसमज वाढू शकतात आणि नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. तुमच्यातील प्रेम कमी होऊन संघर्ष निर्माण होऊ शकतो.

लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती

लक्ष्मीची मूर्ती भेट दिल्याने घरातील सुख-समृद्धी दुसऱ्याकडे जाते, त्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. गणपतीची मूर्ती भेट देऊ नये, कारण यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते, असे मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)