Durgashtami : अग्रहायण दुर्गाष्टमीचे महत्त्व जाणून घ्या…

Published:
अग्रहायण दुर्गाष्टमीचा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे आणि या दिवशी दान केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता राहत नाही.
Durgashtami : अग्रहायण दुर्गाष्टमीचे महत्त्व जाणून घ्या…

दर महिन्याच्या मासिक दुर्गाष्टमीला दुर्गा देवीची मनोभावे पूजा केली जाते. या महिन्याची दुर्गाष्टमी  28 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या अष्टमीला अग्रहायण महिन्यातील दुर्गाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. मासिक दुर्गाष्टमीला देवी दुर्गेची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती येते. या दिवशी उपवास करणे, दुर्गा मातेची विधिवत पूजा करणे, मंत्र जप करणे आणि दानधर्म करणे फायदेशीर ठरते. यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि आत्मविश्वास वाढतो.

अग्रहायण दुर्गाष्टमीच्या तिथीची सुरूवात

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्लाष्टमी तिथी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी समाप्त होईल. दुर्गीष्टमीचा हा मुहूर्त 28 तारखेचा दिवस संपल्यानंतर सुरू होत असला तरीही, दुर्गा देवीची पूजा रात्री करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे 28 नोव्हेंबरचा दिवसच अग्रहायण दुर्गाष्टमीचा दिवस मानला जाईल.

अग्रहायण दुर्गाष्टमीचे महत्त्व

अग्रहायण महिन्यातील दुर्गाष्टमीला मोठे महत्त्व आहे, कारण या दिवशी देवी दुर्गाची विशेष पूजा केली जाते. या पूजेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, पाप नष्ट होतात, दुःखांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी केलेल्या उपासनेने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.  विशेषतः २८ नोव्हेंबर २०२५ च्या दुर्गाष्टमीला हर्षण योग आणि शतभिषा नक्षत्रासारखे शुभ योग जुळून येत असल्याने पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews