वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट मूर्ती घरात ठेवणं हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे, या मूर्तींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो आणि घराला आर्थिक स्थैर्य लाभते. घरात कासवाची मूर्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे, आज आपण कासवाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे काय -काय फायदे होतात, याबद्दल जाणून घेऊयात…
सकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. कासव हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि धन-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
आर्थिक लाभ
कासव हे धनाचे प्रतीक असल्याने पैशांची कमतरता दूर करते आणि कर्जबाजारीपणा कमी करते आणि आर्थिक स्थैर्य आणते.
सुख-शांती
घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदते. धनलाभ, आर्थिक स्थैर्य आणि सुख-समृद्धीसाठी कासव महत्त्वाचे मानले जाते.
वास्तुदोष निवारण
वास्तुदोषामुळे होणाऱ्या समस्या कमी करते. घरातील वास्तुदोष दूर करते, ज्यामुळे भांडणे आणि इतर समस्या कमी होतात.
आरोग्य
बेडरूममध्ये ठेवल्यास निद्रानाशावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते असेही म्हणतात. घरात आरोग्य, शांती आणि कौटुंबिक सुख नांदते. बेडरूममध्ये ठेवल्यास चांगली झोप लागते आणि शांतता पसरते.
कोणत्या धातूची मूर्ती आणि कुठे ठेवावी?
- पितळेचा कासव : सर्वात शुभ मानला जातो; उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा.
- क्रिस्टलचा कासव : ईशान्य (उत्तर-पूर्व) कोनात ठेवणे उत्तम.
- पाण्यातील कासव : पाण्यामध्ये ठेवल्यास दुप्पट फायदा होतो.
कधी आणि कसे ठेवावे
बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार या दिवसांत मूर्ती स्थापित करणे लाभदायक मानले जाते.
घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणे सर्वोत्तम. घरात कासवाची मूर्ती असेल तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम हा तुमच्यावर होत असतो. वास्तूशास्त्रात, घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवतेचं स्थान असतं असं म्हणतात. या दिशेला कासवाची मूर्ती स्थापित केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





