Vastu Tips : घरात शिवलिंग ठेवण्याचे महत्त्वाचे नियम, जाणून घ्या..

Published:
शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर, शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली, तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
Vastu Tips : घरात शिवलिंग ठेवण्याचे महत्त्वाचे नियम, जाणून घ्या..

शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर, शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली, तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. काही लोक घरातही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात. परंतु, शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत. चला तर, याच विशेष नियमांबद्दल जाणून घेऊया…

घरात शिवलिंग ठेवण्याचे महत्त्वाचे नियम

आकार आणि दिशा

घरात अंगठ्याच्या आकाराचे किंवा त्याहून लहान शिवलिंग ठेवावे. मोठे शिवलिंग ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही.  शिवलिंग उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे. या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करतात. 

नियमित पूजा

जर तुम्ही शिवलिंगाची नियमित पूजा करू शकत नसाल, तर ते घरी ठेवू नये. अयोग्य पूजेमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवलिंगाची पूजा करताना हळद वापरू नये आणि बेलपत्र, फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी. 

शिवलिंग एकटे ठेवू नये

शिवलिंगाला कधीही एकटे ठेवू नये. त्यासोबत गणपती, पार्वती, कार्तिकेय आणि नंदीच्या मूर्ती ठेवाव्यात.

एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत

घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत, असे शिवपुराणात म्हटले आहे.

तुटलेले शिवलिंग

तुटलेले किंवा खंडित झालेले शिवलिंग घरात ठेवू नये, ते अशुभ मानले जाते. 

जमिनीवर न ठेवणे

शिवलिंग कधीही जमिनीवर ठेवू नये, त्याला योग्य आसन द्यावे. 

घरात शिवलिंगाची स्थापना का करावी?

घरात शिवलिंगाची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो, घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. घरात शिवलिंग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews