मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी व्रत केल्याने देवी प्रसन्न होते. मार्गशिष महिन्यात गुरुवारी देवीला नैवेद्य दाखवितात. त्यासाठी विविध पदार्थ बनवतात. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीसाठी बेसन लाडू, पुरणपोळी, शिरा किंवा गाजर हलवा असे गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात, ज्यात गाजर हलवा हा पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे, जो ताज्या गाजरांपासून बनतो.
साहित्य
- ताजी गाजरं (किसलेली)
- तूप
- साखर
- दूध
- खवा
- वेलची पूड
- सुकामेवा (बदाम, काजू).
कृती
- एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून किसलेले गाजर चांगले परतून घ्या.
- नंतर त्यात दूध आणि साखर घालून गाजर मऊ होईपर्यंत शिजवा, दूध आटले पाहिजे.
- आता त्यात खवा, वेलची पूड आणि सुकामेवा घालून चांगले मिसळा.
- हलवा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- हा गाजर हलवा गरमागरम किंवा थंड करून महालक्ष्मीला नैवेद्य दाखवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





