Shani Dev : हनुमानाची पूजा करणाऱ्यांवर शनीदेवाचा प्रकोप का होत नाही? यामागील पौराणिक कथा जाणून घ्या..

Published:
हनुमानजींची भक्ती आणि पूजा केल्याने बुद्धी, शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगम साधला जातो, ज्यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि नशीब बदलते, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
Shani Dev : हनुमानाची पूजा करणाऱ्यांवर शनीदेवाचा प्रकोप का होत नाही? यामागील पौराणिक कथा जाणून घ्या..

वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनि दोष कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा करणे हा एक प्रभावी उपाय आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. यामागचे कारण काय आहे? पौराणिक कथा जाणून घ्या..

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार त्रेतायुगातील रामायण काळातील आहे. जेव्हा रावणाने देवी सीता यांचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते, तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमान देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले. हनुमान जेव्हा लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवले होते. त्यावेळी हनुमान देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. कारण देवी सीता म्हणाली की, जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायला येतील तेव्हाच ती त्यांच्यासोबत जाईल. पण हनुमानानी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढले. जेव्हा हनुमानानी शनिदेवाची मदत केली, तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले.

तेव्हा हनुमान म्हणाले – जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो, त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस. त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला. शनिदेवाने प्रसन्न होऊन हनुमानाला आणि त्याच्या भक्तांना त्रास न देण्याचे वचन दिले. यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानाची पूजा होऊ लागली.

शनिदोष कमी होतो 

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केल्याने शनि दोष कमी होतो, मानसिक बळ मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात कारण हनुमानाची उपासना केल्याने शनिदेवाचा कोप कमी होतो आणि त्यांची कृपा प्राप्त होते; यासाठी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करणे आणि तेल अर्पण करणे यांसारखे उपाय सांगितले जातात, ज्यामुळे शनिदेवासोबत बजरंगबलीचीही कृपा मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews