हिंदु धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं घर कसं असाव? कोणत्या दिशेला असावं? याचे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ चुकूनही असता कामा नये, आज आम्ही तुम्हाला मुख्य दरवाजा जवळ कोणत्या गोष्टी ठेवू नये या विषयी सांगणार आहेत. याबद्दल जाणून घेऊयात..
कचरा आणि घाण
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ कचराकुंडी किंवा कचरा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात येते, जी आर्थिक प्रगतीला बाधा आणते. मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा घाण साचू देऊ नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, आर्थिक प्रगती थांबते आणि सुख-समृद्धीस अडथळे येतात.
दारात झाडू ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, घरातील सुख-समृद्धी कमी होते आणि आर्थिक अडचणी वाढतात.
गॅस सिलेंडर
गॅस सिलेंडर थेट दरवाजासमोर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे, कारण यामुळे अडथळे निर्माण होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहात बाधा येते. दरवाजा उघडताच गॅस सिलेंडर दिसू नये, तो बाजूला ठेवावा, यामुळे वास्तुदोष टळतो.
चप्पल स्टँड
अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पलचे स्टँड ठेवतात. पण वास्तूशास्त्रानुसार असे करणे योग्य नाही. दारासमोर चपलांचा ढीग लावल्याने वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते.
तुटलेल्या वस्तू
तुटलेले फर्निचर किंवा इतर वस्तू ठेवू नयेत, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तुटलेले आरसे, चहाचे कप, फर्निचर, घड्याळे किंवा इतर कोणतीही खराब झालेली वस्तू नकारात्मक ऊर्जा आणते आणि अडथळे निर्माण करते. तुटलेल्या वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
घाणेरडे पायपुसणे
दाराजवळ घाण किंवा कचरा असणे अशुभ मानले जाते आणि ते दारिद्र्य वाढवते. अस्वच्छ पायपुसणे नकारात्मकता आणते.
काटेरी झाडे
मुख्य दरवाजासमोर काटेरी झाडे नसावीत. कॅक्टससारखी काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आणि तणाव वाढवतात, ज्यामुळे भांडणे व आर्थिक संकट येऊ शकते.
काय करावे?
- मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा.
- सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी तुळस किंवा मनी प्लांट लावावा.
- दारासमोर सकारात्मक वातावरण ठेवावे, ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





