विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते आणि मंत्रजप केला जातो. गणेशाला सिद्धी विनायक असेही म्हणतात. सिद्धी देवी ही गणेशाची पत्नी आहे. जो कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप करतो, त्याच्या घरात सुख-समृद्धी येते आणि त्याला जीवनात यश मिळते.
गणेश बीज मंत्र
‘ॐ गं गणपतये नमः’
श्री गणेशाचा हा बीज मंत्र असून तो अत्यंत सोपा आहे. या मंत्राचा अर्थ हे गणपती देवा मी तुला नमस्कार करतो. कोणतेही नवीन कार्. सुरू करताना तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर ॐ गं गणपतये नमः मंत्राचा जप करा. हा मंत्र अत्यंत प्रभावी असून तुमच्या कामात यश प्राप्त होते तसेच मनःशांती मिळते.
गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्।
हा गणेश गायत्री मंत्र आहे. एकदंत अर्थात गणरायाकडून आम्हाला ज्ञानाची प्राप्ती व्हावी. तसेच वक्रतुंडाला जाणून घेण्यासाठी आम्ही त्याचे ध्यान करत आहोत, तर त्या दंतीने म्हणजे गणपतीने आम्हाला प्रेरणा द्यावी असा त्याचा अर्थ आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे समस्या तर दूर होतात तसेच प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळते.
विनायक चतुर्थी पूजा विधी
- सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला.
- देवघर स्वच्छ करा, एका चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
- गणपतीची पूजा करण्याचा संकल्प करा.
- गणपतीला गंगाजल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) यांनी स्नान घाला.
- चंदन, कुंकू, हळद, अक्षत, फुले (जास्वंद उत्तम), दूर्वा (21 किंवा 108 जुड्या), फळे अर्पण करा.
- मोदक, लाडू किंवा तुमच्या आवडीचा गोड पदार्थ दाखवा.
- “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. “वक्रतुंड महाकाय” किंवा इतर गणपती मंत्र म्हणा.
- गणपतीची आरती करा. शक्य असल्यास अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणा.
- पूजेनंतर प्रसाद वाटप करा आणि गरीब व गरजूंना दान द्या.





