हिंदू धर्मात कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात करताना पहिले भगवान गणेशाची पूजा केली जाते. त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. कॅलेंडरनुसार विनायक चतुर्थी 24 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊयात…

विनायक चतुर्थीचं महत्त्व 

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजेने होते, त्यामुळे विनायक चतुर्थी सर्व कामांमध्ये यश आणि सिद्धी देते. गणपतीला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात, म्हणजे तो सर्व अडथळे दूर करतो. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील त्रास आणि समस्या संपतात. गणपती बुद्धीची देवता आहे. या व्रतामुळे ज्ञान आणि बुद्धीमध्ये वाढ होते, जे विद्यार्थी आणि ज्ञान मिळवणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. गणपतीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

काय करावे 

  • स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
  • गणपतीची मूर्ती स्वच्छ, सुशोभित ठिकाणी ठेवावी.
  • गणपतीला लाल जास्वंद, गुलाब यांसारखी फुले आणि दूर्वा, चंदन, कुंकू अर्पण करावे.
  • उदबत्ती, कापूर आणि निरांजनाने आरती करावी, घंटानाद करावा.
  • मोदक, लाडू आणि इतर मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा.
  • ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. गणपतीचे मंत्र जपावे, ज्यामुळे सकारात्मकता येते.
  • सात्विक भोजन करावे. मन शांत आणि सकारात्मक ठेवावे.

काय करू नये 

  • उडदाची डाळ, तेल, मीठ यांचा आहारात समावेश करू नये. तामसिक अन्नाचे सेवन करू नये.
  • वादविवाद, भांडणे आणि नकारात्मक विचार टाळावेत. घरातील वातावरण शांत ठेवावे.
  • कोणताही वाद किंवा कलह करू नये, नकारात्मक विचार टाळावेत.
  • या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
  • विनायक चतुर्थीला चंद्राकडे पाहणे अशुभ मानले जाते, म्हणून ते टाळावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)