हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतीची आराधना केली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. मार्गशीष महिना संपला असून आता पौष महिना सुरु झाला आहे. पौष महिन्यानंतरी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी 24 डिसेंबरला म्हणजेच उद्या आहे. या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. विनायक चतुर्थीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दान केल्याने श्री गणेश भगवान प्रसन्न तर होतात, तसेच मानसिक शांती आणि समाधान मिळते. विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे जाणून घेऊयात..
मोदक
मोदक गणपतीला अत्यंत प्रिय असल्याने, प्रसाद म्हणून मोदक वाटणे खूप शुभ मानले जाते. विनायक चतुर्थीला गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
हे ही वाचा
फळांचे दान
विनायक चतुर्थीला गणपतीला प्रिय असणाऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे आरोग्य, आनंद आणि घरात समृद्धी येते. केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब यांसारख्या हंगामी फळांचे दान केल्याने आरोग्यलाभ होतो आणि घरात सुख-समृद्धी येते.
मिठाई
विनायक चतुर्थीला मिठाई दान करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते, नातेसंबंध गोड होतात आणि आरोग्य लाभते.
कपडे
गरिबांना कपडे दान केल्याने पुण्य मिळते. गरीब आणि गरजू व्यक्तींना कपडे दान करणे शुभ मानले जाते, यामुळे पुण्य मिळते. गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान केल्याने पुण्य मिळते आणि घरात कधीही अन्नाची कमी होत नाही.
दान करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- दान करण्याच्या वस्तू स्वच्छ आणि शुद्ध असाव्यात.
- दान करताना मनात कोणताही स्वार्थ न ठेवता दान करावे.
- नेहमी गरीब आणि गरजू लोकांनाच दान द्या.
- हसत-खेळत दान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते.
- विनायक चतुर्थीच्या दिवशी दान करणे विशेष फलदायी मानले जाते.
दान करण्याचे फायदे
- गणपतीची पूजा आणि दान केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि यश मिळते, असे मानले जाते.
- योग्य वस्तूंचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि सकारात्मकता वाढते.
- गणपती बुद्धीचे देवता असल्याने, त्यांच्या पूजेने आणि दानाने बुद्धीमध्ये वाढ होते आणि ज्ञानप्राप्ती होते.
- श्रद्धापूर्वक केलेली पूजा आणि दान यामुळे मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)