Marathi News

Rath Saptami 2026 : रथसप्तमी कधी? सूर्यदेवाची पूजा कशी करावी, जाणून घ्या…

Published:
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यादिवशी सूर्यदेवाची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे.
Rath Saptami 2026 : रथसप्तमी कधी? सूर्यदेवाची पूजा कशी करावी, जाणून घ्या…

रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षामधील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घ्या…

कधी आहे रथसप्तमी ?

रक्षसप्तमी रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार 25 जानेवारीला रथसप्तमी साजरी केली जाईल. यावर्षी रथ सप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी 7 वाजून13 मिनिटांपर्यंत असेल.

रथसप्तमीची पूजा कशी करायची

  • सूर्योदयापूर्वी, शक्यतो अरुणोदयाच्या वेळी, पवित्र स्नान करावे.
  • सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे (अर्घ्य द्यावे).
  • सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि ‘ॐ सूर्याय नमः’ किंवा ‘ॐ घृणि सूर्याय नमः’ यांसारख्या मंत्रांचा जप करावा.
  • लाल फुले, चंदन, कापूर आणि उदबत्ती वापरून सूर्यदेवाची पूजा करावी, तुपाचा दिवा लावावा.
  • या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. 

रथसप्तमीचे महत्त्व

यंदा रथ सप्तमी रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून, या दिवशी आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांची पूजा केली जाते, याला सूर्य जयंती असेही म्हणतात. हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो आणि त्यांच्या उपासनेसाठी पवित्र आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे. याला उत्तरायणाची सुरुवात मानले जाते, जेव्हा सूर्य देव उत्तर गोलार्धात प्रवेश करतात. या दिवशी पूजा आणि दानधर्म केल्याने सात प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews