Shiv Mahapuran : शिवपुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात ‘हे’ संकेत…

Published:
शिव महापुराणानुसार, भगवान शिवाने स्वत: माता पार्वतीला अशा काही लक्षणांबद्दल सांगितले होते, ज्यावरून हे समजू शकते की, मृत्यूची वेळ जवळ आली आहे. जाणून घेऊयात...
Shiv Mahapuran : शिवपुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात ‘हे’ संकेत…

शिवपुराणानुसार, भगवान शिवाने माता पार्वतीला मृत्यूच्या काही लक्षणांबद्दल सांगितले आहे, शिव महापुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा काही संकेत मिळू लागतात. हे संकेत नेमके काय? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

शिवपुराणातील मृत्यूची प्रमुख लक्षणे

पूर्वजांची उपस्थिती : मृत्यूच्या काही दिवस आधी, व्यक्तीला आपल्या आजूबाजूला पूर्वज किंवा कोणीतरी असल्याची जाणीव होते, त्यांच्या अस्तित्वाचा भास होतो. त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असे त्याला वाटते.

डावा हात थरथरणे : जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात आठवडाभर सतत थरथरत असेल आणि टाळू कोरडी पडत असेल, तर एक महिन्याच्या आत मृत्यू येऊ शकतो.

सावली दिसणे थांबते : पाणी, तेल किंवा तुपात आपले प्रतिबिंब दिसणे बंद होणे, किंवा सावली डोक्याशिवाय दिसणे, ही मृत्यू जवळ आल्याची चिन्हे आहेत. शिव महापुराणानुसार जेव्हा सावली दिसणे थांबते तेव्हा त्या व्यक्तीकडे कमी वेळ आहे असे समजावे.

सूर्य आणि चंद्र : सूर्य, चंद्र किंवा अग्नीचा प्रकाश नीट न दिसणे, सर्व दिशांना अंधार दिसणे, किंवा सूर्य-चंद्राभोवती काळे वर्तुळ दिसणे, हे सहा महिन्यांच्या आत मृत्यूचे संकेत असू शकतात.

शरीराचे रंग बदलणे : जर शरीर पांढरे किंवा पिवळे पडू लागले आणि त्यावर लाल चट्टे दिसू लागले, तर मृत्यू जवळ आहे असे मानले जाते. शिव महापुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर निळे पडू लागते. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या शरीरावर लाल खुणा दिसू लागतात. शरीराचा रंग पांढरा, फिकट किंवा निळसर पडणे, लाल चट्टे येणे (६ महिने आधी), आणि शरीराचे काही भाग (डोळे, जीभ, कान) दगडासारखे जड होणे.

इंद्रियांमध्ये बदल : तोंड, कान, डोळे, जीभ नीट काम करत नसतील किंवा शरीराच्या कोणत्याही भागात मुंग्या येत असतील, तर मृत्यूच्या जवळची ही लक्षणे असू शकतात.

नक्षत्रांचा अभाव : आकाशात ध्रुवतारा किंवा इतर तारे दिसत नसतील, तर हे ६ महिन्यांच्या आत मृत्यूचे लक्षण असू शकते. 

कुत्रे किंवा प्राण्यांचे वर्तन : एखाद्या व्यक्तीला पाहून कुत्रे रडणे किंवा कावळे आणि गिधाडे वारंवार आजूबाजूला जमणे.

या संकेतांनंतर काय करावे?

  • ज्यांना अशी लक्षणे दिसतात, त्यांनी शिवाची किंवा विष्णूची आराधना करावी, देवाचे नामस्मरण करावे आणि आध्यात्मिक मार्गावर लक्ष केंद्रित करावे, असे शिवपुराण सांगते.
  • शिवपुराण सांगते की, असे संकेत दिसल्यावर व्यक्तीने भीती न बाळगता परमेश्वराचे स्मरण करावे आणि भक्ती करावी.
  • जे लोक हे संकेत ओळखतात, त्यांनी आपली अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि देवाचे नामस्मरण करावे, असे सांगितले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)