Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील ‘या’ वस्तू वाढवतात नकारात्मकता

Published:
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणे चूकीचे आहे. वास्तूनुसार या गोष्टी बाथरूममध्ये ठेवल्याने गरिबी येते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात...
Vastu Tips :  वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील ‘या’ वस्तू वाढवतात नकारात्मकता

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात असलेलं बाथरूम हे असं स्थान आहे की त्या ठिकाणी प्रचंड नकारात्मक शक्ती असते, त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. वास्तूमध्ये घराच्या बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत. वास्तूनुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

तुटलेला आरसा

तुटलेला आरसा हा वास्तुदोष निर्माण करतो, आर्थिक समस्या आणतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतो, म्हणून लगेच बदला.

खराब झालेली झाडे

वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत. बाथरूममध्ये झाडे ठेवल्यास ती लवकर खराब होतात आणि नकारात्मक ऊर्जा वाढते, कारण त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही.

तुटलेली चप्पल

बाथरूममध्ये तुटलेली चप्पल किंवा इतर तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ग्रहांची अशुभ स्थिती बिघडू शकते. चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या.

रिकामी बादली

बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते. रिकामी बादली हे आर्थिक नुकसान दर्शवते. त्यामुळे बादलीत थोडे पाणी भरून ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममधील वस्तूंचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो.

ओले कपडे

बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नयेत. ओले कपडे बाथरूममध्ये ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. बाथरूममध्ये ओले कपडे ठेवल्याने सूर्यदोष होतो, घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि वाद वाढतात.

काय करावे?

  • बाथरूममध्ये स्वच्छता नसेल तर लक्ष्मी माता नाराज होते, त्यामुळे स्वच्छता महत्त्वाची आहे.
  • बाथरूममध्ये सैंधव मिठाची वाटी ठेवल्यास वास्तुदोष कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे सांगितले जाते.
  • बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते, कारण हा रंग सुख-समृद्धीचे प्रतीक आहे.
  • आरसा दारासमोर नसावा, तो बाथरूमच्या आतील भिंतीवर लावावा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)