Spiritual : मृत्यूनंतर माणूस आपल्यासोबत ‘या’ 3 गोष्टी घेऊन जातो, जाणून घ्या…

Published:
शास्त्र आणि गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर माणूस रिकाम्या हाताने जात नाही, तर ३ गोष्टी आपल्यासोबत घेऊन जातो. याबद्दल जाणून घेऊयात...
Spiritual  : मृत्यूनंतर माणूस आपल्यासोबत ‘या’ 3 गोष्टी घेऊन जातो, जाणून घ्या…

या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला एके दिवशी निघून जावे लागते. मृत्यूनंतर मनुष्य खाली हात जातो असं नेहमी सांगितलं जातं. पण वास्तवात तसं नाहीये. मृत्यूनंतर मनुष्य तीन महत्त्वाच्या गोष्टी सोबत घेऊन जातो. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

चांगली आणि वाईट कर्म

हिंदू धर्मशास्त्र आणि गरूड पुराणांनुसार, मृत्यू हे अंतिम सत्य असून, शरीर नश्वर आहे. मृत्यूनंतर धन, संपत्ती, नातेवाईक सर्व काही मागे राहते, परंतु व्यक्ती आपली कर्मे सोबत घेऊन जातो. या कर्मांच्या आधारावरच आत्म्याचा पुढील प्रवास ठरतो. गरूड पुराणानुसार, मृत्यूच्या शेवटच्या क्षणी माणसाच्या मनात जे विचार असतात, त्यानुसार त्याचा पुढील जन्म ठरतो. म्हणूनच आयुष्यात चांगल्या कर्मांचे आचरण करणे श्रेष्ठ मानले जाते. व्यक्तीने आयुष्यात केलेले चांगले किंवा वाईट कृत्य हे सावलीसारखे मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहतात. हे कर्मच पुढील जन्माची दिशा ठरवतात.

चांगली कर्मे (पुण्य) : व्यक्तीने आयुष्यभरात केलेली सत्कर्मे, दान, धर्म आणि इतरांना केलेली मदत ही पुण्याईच्या रूपात आत्म्यासोबत जाते, जी पुढचा जन्म सुखमय बनवते. व्यक्तीने संचित केलेले पुण्य किंवा पाप ही अंतिम कमाई आहे, जी मृत्यूनंतर परलोकात सुखी किंवा दुःखी राहण्यास कारणीभूत ठरते. 
वाईट कर्मे (पाप) : माणसाने केलेले अन्याय, अत्याचार, पाप आणि चुकीची कृत्ये ही त्याच्या सोबत जातात, ज्यांचे फळ त्याला भोगावे लागते.

अपूर्ण इच्छा

मृत्यूच्या समयी मनात असलेल्या इच्छा, विचार आणि वासना आत्म्याला चिकटून राहतात, ज्या पुनर्जन्माचे कारण बनतात. आयुष्यातील अपूर्ण राहिलेल्या इच्छा, लोभ आणि मोह यांसारखे संस्कार आत्म्यासोबत जातात. या अपूर्ण इच्छांमुळेच अनेकदा पुन्हा जन्म घ्यावा लागतो (पुनर्जन्म).

कर्ज

जर व्यक्तीने कुणाचे कर्ज फेडले नसेल, तर ते कर्ज फेडण्यासाठी त्याला पुढच्या जन्मात जबाबदार राहावे लागते. धार्मिक मान्यतेनुसार, जीवन जगताना चांगली कर्मे करावीत आणि शक्य तितके कर्जमुक्त राहावे, जेणेकरून परलोकात किंवा पुढच्या जन्मात त्रासाला सामोरे जावे लागणार नाही आयुष्यातील अनुभव आणि अपूर्ण राहिलेले कर्ज पुढील जन्मापर्यंत व्यक्तीचा पिच्छा सोडत नाहीत, ज्यामुळे त्याला पूर्वजन्माच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)