Marathi News

Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी विशेष! नैवेद्यासाठी बनवा मालपुआ, तो कसा बनवतात जाणून घ्या…

Published:
अंगारकी चतुर्थीच्या नैवेद्यासाठी तुम्ही मालपुआ नक्की बनवू शकता, कारण हा एक पारंपरिक आणि चविष्ट पर्याय आहे, जो मोदकांइतकाच लोकप्रिय आहे.
Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी विशेष! नैवेद्यासाठी बनवा मालपुआ, तो कसा बनवतात जाणून घ्या…

या अंगारकी चतुर्थीला तुम्हीही काही पारंपरिक आणि चविष्ट मिठाई बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. गणपती बाप्पाला मालपुआ खूप आवडतात, असं म्हटलं जातं. म्हणूनच चतुर्थीला बाप्पाला मालपुआचं नैवेद्य दाखवल्यास ते नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • रवा
  • दूध
  • पाणी
  • वेलची पावडर
  • साखर
  • साजूक तूप

कृती

  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, थोडी वेलची पूड, आणि चिमूटभर मीठ घ्या. त्यात हळूहळू दूध आणि पाणी घालून गुळगुळीत, पळीने पडेल असे मिश्रण तयार करा. पीठ भिजवण्यासाठी थोडा वेळ (१५-२० मिनिटे) ठेवा.
  • दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची पूड आणि केसर घालू शकता. पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.
  • कढईत तूप गरम करा. तयार पिठाचा एक मोठा चमचा घेऊन गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी-तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  • तळलेले मालपुआ गरम पाकात लगेच टाका. ते पाकात चांगले भिजल्यावर काढून घ्या.
  • काही वेळाने मालपुआ ताटात घेऊन बाप्पाला नैवेद्यं अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews