गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. गणेश चतुर्थी, संकष्टी व अंगारकी चतुर्थीला घराघरांत खोबऱ्या-गुळाच्या गोड सारणाचे हे पारंपरिक महाराष्ट्रीयन मोदक आवर्जून बनवले जातात. या वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला म्हणजेच ६ तारखेला, तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने घरी सुबक तळणीचे मोदक तयार करू शकता…

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • किसलेले खोबरे
  • गूळ
  • वेलची पूड
  • तळण्यासाठी तेल.

कृती 

  • खोबरं आणि गूळ एकत्र करून सारण तयार करा.
  • पीठ मळून घ्या आणि त्याचे छोटे गोळे बनवा.
  • गोळ्यांची पारी करून त्यात सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या.
  • गरम तेलात मोदक सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 
  • या अंगारकी चतुर्थीला तुम्ही ही सोपी रेसिपी वापरून बाप्पासाठी खास तळणीचे मोदक बनवू शकता आणि त्यांचा नैवेद्य दाखवू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)