Marathi News

Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी! अंगारकी संकष्टी निमित्त उपवासाला बनवा रताळ्याची खीर…

Published:
अंगारकी चतुर्थीच्या उपवासासाठी रताळ्याची खीर हा एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे. ही खीर आरोग्यदायी असून, उपवासाच्या दिवशी आवश्यक ऊर्जा देते आणि पारंपरिक उपवासाच्या पदार्थांपेक्षा वेगळा अनुभव देते.
Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी! अंगारकी संकष्टी निमित्त उपवासाला बनवा रताळ्याची खीर…

रताळी आरोग्यासाठी उत्तम असतात. उकडलेली रताळी खायला सुद्धा अधिक रुचकर लागतात. उपवासाला देखील रताळी खाली जातात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. चला तर मग अंगारकी चतुर्थी निमित्त उपवासाला खाता येणारी गोड रताळ्याची खीर बनवायची रेसिपी जाणून घेऊयात…

साहित्य

  • रताळी (उकडलेली आणि कुस्करलेली)
  • दूध
  • तूप
  • साखर किंवा गूळ (चवीनुसार)
  • वेलची पूड
  • जायफळ पावडर
  • सुकामेवा (बदाम, काजू, मनुके) 

कृती

  • रताळ्याची खीर बनवण्यासाठी रताळे स्वच्छ धुवून उकडवून घ्या.
  • त्यानंतर रताळे थंड करून त्यांची साल काढून घ्या.
  • साल काढून झाल्यानंतर रताळी व्यवस्थित कुस्करून घ्या. यामध्ये अख्खे तुकडे टाकू नये.
  • एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात उकडलेले रताळे टाकून घ्या.
  • त्यानंतर त्यात दूध टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात साखर किंवा गूळ टाका. गूळ विरघळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • गूळ विरघळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करा आणि खीर थोडी घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
  • सुकामेवा घालून गरमागरम किंवा थंड सर्व्ह करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews