प्रत्येक शुभ कार्याच्या सुरवातीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि दुसरी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पंचांगानुसार ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा चतुर्थीच्या सर्व दिवसांपैकी सर्वात शुभ दिवस मानला जातो. फक्त एकाच अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षातील सर्व चतुर्थीच्या दिवसांचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. अशा या खास दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता….

अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा 2026

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेशभक्तांना
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा..!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या
सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!

संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो
तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज श्रीगणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम
सोपे होईल सर्व काम.
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया तू
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ||
गणपती बाप्पा मोरया

अंगारकी निमित्त तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा !

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा!

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)