Marathi News

Angaraki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय? जाणून घ्या पूजा पद्धत…

Published:
अंगारकी चतुर्थी ही श्रीगणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते. या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवनात यश, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.
Angaraki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय? जाणून घ्या पूजा पद्धत…

हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते. दर सहा महिन्यांनी मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात. जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आणि पूजा पद्धत….

कधी आहे अंगारकी चतुर्थी? 

पंचांगानुसार, पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारी 2026 मंगळवारी सकाळी 08 वाजून 01 मिनिटांनी सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 06 वाजून 52 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार अंगारकी चतुर्थी  6 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा ती ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखली जाते.  हे व्रत मोक्षदायक मानले जाते आणि यामुळे बुद्धी, विवेक आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात समाधान मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते. या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवनात यश, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. या दिवशी व्रत केल्यास वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते आणि सर्व संकटं दूर होतात, अशी भाविकांची धारणा आहे. ‘अंगारक’ म्हणजे मंगळ ग्रह, त्यामुळे मंगळवारी येणारी चतुर्थी विशेष फलदायी मानली जाते.

पूजा पद्धत (विधी)

  • ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ (शक्यतो लाल किंवा पिवळ्या) रंगाचे वस्त्र परिधान करा.
  • चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करा.
  • कुंकू, चंदन, फुले, हार, अक्षता आणि २१ दुर्वा अर्पण करा.
  • गणपतीला आवडणारे मोदक किंवा इतर फळांचा नैवेद्य दाखवा.
  • तुपाचा दिवा लावून ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करा आणि गणपतीची आरती करा.
  • दिवसभर उपवास करा (फलाहार घेऊ शकता).
  • संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्या, त्यानंतरच उपवास सोडा आणि भोजन करा (मोदकांचा नैवेद्य दाखवून).

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews