Marathi News

Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? वाचा महत्त्व आणि पूजेची पद्धत…

Published:
अंगारकी चतुर्थी हा गणपती उपासकांसाठी एक विशेष आणि फलदायी दिवस असतो, कारण तो मंगळवार आणि चतुर्थी तिथी यांचा संयोग असतो.
Angarki Chaturthi 2026 : अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? वाचा महत्त्व आणि पूजेची पद्धत…

हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते. संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे. पंचांगानुसार ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षातील सर्व चतुर्थीच्या दिवसांचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

गणपती बाप्पाला ‘संकटनाशक’ मानले जाते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, समस्या संपतात आणि हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. ही चतुर्थी वर्षातून काही दोनदा येते आणि ती अत्यंत फलदायी मानली जाते. या व्रताचे पालन केल्यास अनेक चतुर्थींचे फळ मिळते, असेही म्हटले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते. या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवनात यश, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.

अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?

अंगारकी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी’ म्हणतात; हा दिवस गणपती पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, कारण ‘अंगारक’ म्हणजे मंगळ ग्रह, आणि या दिवशी गणपतीची पूजा केल्याने संकटं दूर होऊन कार्यसिद्धी होते. ‘अंगारक’ या शब्दाचा अर्थ ‘मंगळ’ (मंगळ ग्रह) असा होतो. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते, तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात, जे अत्यंत शुभ मानले जाते.

पूजेची पद्धत

  • ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
  • गणपतीची मूर्ती चौरंगावर ठेवून कुंकू, चंदन, फुले, २१ दुर्वा अर्पण कराव्यात.
  • मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी.
  • चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन व्रत सोडावे.
  • या दिवशी क्रोध, खोटे बोलणे, मांसाहार टाळावा आणि नकारात्मक विचार करू नयेत. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews