गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते. हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी, जी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी गणपतीची पूजा केल्यास वर्षभरातील संकष्ट दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. अंगारकी चतुर्थीची गणेश पुराणात एक कथा सांगितली जाते. चला तर तर मग ही पौराणिक कथा जाणून घेऊयात…
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व
अंगारकी चतुर्थी या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात, मंगळ दोषापासून मुक्ती मिळते आणि वर्षभराच्या चतुर्थीचे फळ मिळते. या व्रतात गणपतीला दुर्वा व मोदकांचा नैवेद्य दाखवून, चंद्रोदयावेळी चंद्रदर्शन व अर्घ्य देऊन उपवास सोडतात, ज्यामुळे बुद्धी, बळ आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.






