गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनाने केली जाते. अंगारकी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. “अंगारक” म्हणजे मंगळ ग्रहाचा एक नाव. म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते. अंगारकी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊयात…

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय करावे?

  • लवकर उठून स्नान करा, गणपतीची षोडशोपचार पूजा करा.
  • गणपतीला लाल फुले, जास्वंदीची फुले आणि २१ दुर्वा अर्पण करा.
  • गणपती मंत्रांचा जप करा, अथर्वशीर्ष पठण करा.
  • २१ मोदक किंवा इतर लाडूंचा नैवेद्य दाखवा.
  • चंद्रोदयाची वाट पाहून चंद्राला अर्घ्य द्या आणि मगच उपवास सोडा.
  • गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय करू नये?

  • दिवसभर उपवास करावा, फलाहार घेऊ शकता.
  • राग, लोभ, मत्सर, चुकीची कामे आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये.
  • कुटुंबातील सदस्य किंवा बाहेरच्या कोणाचाही अनादर करू नये.
  • गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करू नये (शमीची पाने वापरू शकता).
  • लसूण आणि कांदा (तामसिक अन्न) हे पदार्थ टाळावे लागतात, कारण ते उपवासाच्या पवित्रतेत बाधा आणतात.
  • गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी जाड धान्ये उपवासात वर्ज्य मानली जातात.
  • ताजे आणि सात्विक अन्न खाणे महत्त्वाचे असते, शिळे अन्न खाऊ नये.
  • उपवासात मीठ टाळणे किंवा कमी वापरणे पसंत केले जाते.
  • मद्य आणि मांसाहार या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)