Marathi News

Angaraki Chaturthi 2026 : कधी आहे अंगारकी चतुर्थी ? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ…

Published:
अंगारकी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी मंगळवारी येणे, जी गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी उपवास केल्यास गणपतीची विशेष कृपा मिळते.
Angaraki Chaturthi 2026 : कधी आहे अंगारकी चतुर्थी ? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ…

अंगारकी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो. नववर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चंद्रोदय वेळ, मुहूर्त, आणि महत्त्व…

कधी आहे अंगारकी चतुर्थी? 

पंचांगानुसार, पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारी 2026 मंगळवारी सकाळी 08 वाजून 01 मिनिटांनी सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 06 वाजून 52 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार अंगारकी चतुर्थी  6 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.

चंद्रोदयाची वेळ

पंचांगानुसार, जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 08 वाजून 54 मिनिटांनी असेल. या वेळी चंद्राची पूजा आणि पाणी अर्पण करून अर्घ्य द्यावे. त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी रोजी सूर्योदयानंतर व्रताचे पारण करावे.

अंगारकी चतुर्थी मुहूर्त

गणेश पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 09 वाजून 51 मिनिट ते दुपारी 01 वाजून 45 मिनिटांचा आहे. तसेच अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजून 06 मिनिट ते 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. राहुकाळ दुपारी 03 वाजून 03 मिनिट ते 04 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या काळात पूजा टाळावी. राहुकाळात कोणतेही शुभ कार्य करू नका.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी आहे, जी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येते आणि अत्यंत शुभ मानली जाते, कारण मंगळवारी आल्याने तिला अंगारकी म्हणतात, ज्यात चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची असून या दिवशी गणपतीची पूजा व उपवास केल्याने सर्व संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे.  या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात, असे मानले जाते. पंचांगानुसार रात्री चंद्रोदयाच्या वेळीच उपवास सोडला जातो, त्यामुळे रात्री चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची आहे. गणेशाची उपासना केल्याने अडथळे दूर होऊन पुण्यप्राप्ती होते, त्यामुळे चंद्रोदयावेळी पूजा आणि उपवास सोडणे शुभ मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews