Vastu Shastra : घरात सतत भांडणं आणि मतभेद वाढतायत? तर नक्की करा ‘हे’ वास्तु उपाय, घरात नांदेल सुख-शांती

Published:
घरात सतत भांडणे आणि तणाव जाणवत असल्यास, हे वास्तुदोषाचे लक्षण असू शकते. 'हे' उपाय केल्यास घरातील भांडणे आणि नकारात्मकता दूर होऊन सुख-शांती नांदेल.
Vastu Shastra : घरात सतत भांडणं आणि मतभेद वाढतायत? तर नक्की करा ‘हे’ वास्तु उपाय, घरात नांदेल सुख-शांती

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत, अनेकदा असं होत की काहीही कारण नसताना घरात वाद होतो, जर असे वाद आणि भांडणं दररोजच होत असतील तर काय करावं? यावर वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

घर स्वच्छ ठेवा 

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत भांडणे आणि मतभेद होत असल्यास ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व) नेहमी स्वच्छ ठेवावा, कारण तिथे देवाचा वास असतो। या भागात कचरा, जड वस्तू किंवा शौचालय टाळावे. ईशान्य कोपरा म्हणजे देवघर बनवण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. ही जागा स्वच्छ ठेवल्यास घरातील सुख-शांती वाढते.  मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवा. सकाळी घर झाडून पुसताना पाण्यात खडे मीठ टाकल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

नियमित दिवा लावावा

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत भांडणे आणि मतभेद होत असल्यास, संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावणे सकारात्मकता वाढवते. संध्याकाळी घराच्या मुख्य दारात किंवा देवघरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते. देवघर आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. संध्याकाळी घरात कपूर, लोबान किंवा गोवरीचा धूप दाखवल्याने भांडणे कमी होऊन शांतता निर्माण होते.

दरवाजा उघडताना काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत भांडणे आणि मतभेद होण्याचे प्रमुख कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते. मुख्य दरवाजा उघडताना होणारा आवाज यामुळे कलह वाढतो.

बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा फोटो असावा

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत भांडणे आणि मतभेद होत असल्यास, बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा प्रेमाचे प्रतीक असलेला फोटो किंवा पेंटिंग लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हे चित्र पती-पत्नीमधील संबंध सुधारते, घरात प्रेम व सुख-शांती वाढवते.

तुटलेल्या वस्तू टाळा

घरातील तुटलेली काच, बंद घड्याळे, खराब झालेली फर्निचर आणि जुने भंगार वस्तू त्वरित घराबाहेर काढा, कारण यामुळे नकारात्मकता वाढते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews