Bhishma Dwadashi 2026 : आज भीष्म द्वादशी! जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व…

Published:
माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह म्हणून ओळख असलेल्या गंगापुत्र देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते.
Bhishma Dwadashi 2026 : आज भीष्म द्वादशी! जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व…
माघ शुक्ल द्वादशीला साजरी होणारी ‘भीष्म द्वादशी’ (भीष्म निर्वाण द्वादशी) हे भीष्म पितामहांच्या स्मरणाचे, पितृदोषातून मुक्ती आणि सुख-समृद्धी मिळवून देणारे पवित्र व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि भीष्मांची पूजा करून तर्पण केले जाते. हे व्रत मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरातील वास्तुदोष किंवा पितृदोष कमी करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते.

कधी आहे भीष्म द्वादशी?

29  जानेवारी 2026 रोजी भीष्म द्वादशी साजरी केली जाईल, पंचांगानुसार, द्वादशी तिथी 29 जानेवारी रोजी दुपारी 01 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल आणि 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 09 मिनिटांनी संपेल. भीष्म द्वादशीचा दिवस महाभारतातील भीष्म पितामह यांच्या स्मृतीस समर्पित आहे, ज्यांनी सूर्य उत्तरायणात असताना आपले जीवन दिले.

भीष्म द्वादशी व्रताचे महत्त्व

भीष्म पितामहांनी माघ शुद्ध अष्टमीला देह ठेवला, त्यानंतर द्वादशीला त्यांची उत्तरक्रिया करण्यात आली. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, सुख-समृद्धी प्राप्त होते आणि पितृदोष दूर होतो. भीष्म द्वादशी (माघ शुक्ल द्वादशी) हे भीष्म पितामहांच्या इच्छामरणाचे आणि महान त्यागाचे स्मरण करणारे महत्त्वपूर्ण व्रत आहे. यादिवशी लक्ष्मी-नारायण पूजा आणि सूर्योपासना (तीळ व जल अर्घ्य) केल्याने पितृदोष नष्ट होतात, सुख-समृद्धी लाभते आणि अकाली मृत्यूचे भय टळते, अशी धार्मिक धारणा आहे. या दिवशी तीळ आणि पाण्याने तर्पण केल्यास पूर्वजांना सद्गती लाभते.  भीष्म पितामहांच्या स्मरणाने इच्छित फळ, यश आणि बुद्धी मिळते.  हे व्रत धर्म, सत्य आणि कर्तव्याचे पालन करण्याची प्रेरणा देते.

पितृदोषातून मुक्तता

भीष्म द्वादशी तिथी अतिशय महत्त्वाची मानली जीते. यादिवशी पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करुन पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी यादिवशी पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करावं. यादिवशी विधी झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणेसह तीळ दान करणे महत्त्वाचं असतं. त्यातून पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. त्याशिवाय या दिवशी तिळाचं सेवन केल्यास पाप नष्ट होतात आणि प्रत्येक कामात यश मिळतं अशी मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)