Bhogi 2026 : भोगी स्पेशल भोगीच्या भाजीची खिचडी पाहा सोपी रेसिपी…

Published:
भोगीची खिचडी म्हणजे हिवाळ्यातील भाज्या आणि धान्यांचा वापर करून बनवलेला एक पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आहे.
Bhogi 2026 : भोगी स्पेशल भोगीच्या भाजीची खिचडी पाहा सोपी रेसिपी…

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणासाठी तयार केली जाणारी, विविध हिवाळी भाज्या, तांदूळ आणि डाळ घालून बनवलेली पौष्टिक आणि पारंपरिक ‘भोगीची खिचडी’  कशी तयार करावी हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

साहित्य

  • राळा 
  • तांदूळ 
  • मूग डाळ 
  • हिवाळी भाज्या (उदा. गाजर, वाटाणे, फरसबी, बटाटा)
  • मिरची, आले, टोमॅटो, दालचिनी, हळद, मीठ, तेल/तूप, मोहरी, जिरे.

कृती 

  • राळा आणि तांदूळ एकत्र धुवून घ्या. डाळ देखील धुवा. सर्व भाज्या चिरून घ्या.
  • कुकरमध्ये तेल/तूप गरम करून मोहरी, जिरे, दालचिनी, आले-मिरचीची फोडणी द्या.
  • टोमॅटो घालून परता, नंतर चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिटे परता.
  • त्यात डाळ, तांदूळ आणि राळा घालून चांगले मिसळा.
  • हळद, मीठ आणि पुरेसे पाणी घालून कुकरचे झाकण लावा.
  • ३-४ शिट्ट्या होईपर्यंत किंवा राळा आणि डाळ मऊ होईपर्यंत शिजवा.
  • गरमागरम खिचडीला वरून तूप घालून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि तिळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा. 

टीप

भात चिकट होऊ नये म्हणून राळा आणि तांदूळ एकत्र न भिजवता, शिजवताना पाणी योग्य प्रमाणात वापरा. 
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)