Ukhane For Makar Sankranti : मकर संक्रांतीला घ्या ‘हे’ खास उखाणे, वाचा उखाण्यांची लिस्ट…

Published:
मकर संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी सर्वच महिला छान नटून थटून तयार होतात. तसेच या दिवशी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमांच्या दिवशी महिला उखाणे घेतात. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांती निमित्त हटके काही उखाणे सांगणार आहोत.
Ukhane For Makar Sankranti : मकर संक्रांतीला घ्या ‘हे’ खास उखाणे, वाचा उखाण्यांची लिस्ट…

मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सुवासिनी महिला हळदी कुंकूमध्ये उखाणे घेण्यासाठी सांगितलं जातं. मग अशाच या खास दिवसासाठी आम्ही काही ट्रेंडिंग आणि लेटेस्ट उखाणे घेऊन आलो आहोत…

मकर संक्रांतीसाठी खास उखाणे

ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ
…रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगूळ

मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,
…राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

लग्नानंतर मकर संक्रातचा पहिला सण करते साजरा,
…रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
…रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मिळाले मला

चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात
… रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला करा सुरूवात

तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा
……रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा

महालक्ष्मीच्या देवळात आरती सुरू झाली मंद सुरात
…रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात

ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
…रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.

मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी,
मी घेतली …रावांसोबत, आयुष्यभराची सवारी

जाई जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती,
… रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती.

तीळगुळ घ्या, गोड गोड बोला,
… रावांचे नाव घेण्याचं भाग्य मिळालं मला

माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी
….. रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी

मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला
…. रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला

हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध
… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध

हळदी-कुंकवाचा रंग, सौभाग्याचं प्रतीक,
…. रावांचं नाव घेते, जीवन होवो सुखी-निश्चित.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)