दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारतासह जगभरात नाताळ सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांना भेटवस्तू दिल्या जातात. तर तुम्हीही नाताळनिमित्त या भेट वस्तू तुमच्या प्रियजणांना देत असाल तर ही चुक करू नका. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नये…
धारदार वस्तू
चाकू, कात्री, तलवारी यांसारख्या वस्तू नात्यांमध्ये तणाव आणि कटुता निर्माण करतात, असे मानले जाते.
रुमाल आणि पेन
रुमाल आणि पेन या वस्तू देण्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो, असे म्हटले जाते. कारण त्या नातेसंबंधात दुरावा, नकारात्मकता आणू शकतात किंवा दुःखाचे प्रतीक मानल्या जातात. या वस्तू नात्यात कटुता आणू शकतात, असे मानले जाते. रुमाल आणि पेन यांसारख्या वस्तू भेट दिल्याने नातेसंबंधात वैर निर्माण होऊ शकते.
धार्मिक मूर्ती
वास्तुशास्त्रानुसार नाताळाच्या दिवशी देवाच्या मूर्ती भेट देऊ नका. मूर्तींना योग्य सन्मान आणि स्थानाची गरज असते. चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः ख्रिसमसच्या दिवशी या वस्तू देणे टाळावे. देवाची मूर्ती भेट देणे टाळावे, कारण समोरची व्यक्ती तिची योग्य काळजी घेऊ शकणार नाही, अशी भीती असते.
काटेरी रोपे
काटेरी रोपे हे नकारात्मकता आणू शकतात, त्यामुळे देऊ नयेत. काटेरी रोपे नकारात्मक ऊर्जा आणतात आणि नात्यात काटे निर्माण करतात, असे मानले जाते.
मत्स्यालय किंवा झरे फोटो
धबधबे, कासव, मत्स्यालय यांसारख्या चित्रांच्या फ्रेम्समुळे आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात. यांसारख्या चित्रांच्या फ्रेम्समुळे आर्थिक समस्या येऊ शकतात.
बूट किंवा चप्पल
वास्तुशास्त्रानुसार, नाताळ (ख्रिसमस) निमित्त बूट किंवा चप्पल भेट देणे टाळावे कारण असे केल्याने नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो, आर्थिक नुकसान होऊ शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. अशा वस्तू भेट दिल्याने नात्यांमध्ये कटुता येऊ शकते आणि संबंध तुटू शकतात, यामुळे घरात पैसा टिकत नाही आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





