Sat, Dec 27, 2025

Christmas 2025 : नाताळ निमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना द्या ‘या’ खास भेटवस्तू

Published:
भेटवस्तू निवडताना मित्राची आवड, गरज आणि तुमचे बजेट विचारात घ्या, जेणेकरून ती भेट त्यांना मनापासून आवडेल आणि सणाचा आनंद द्विगुणित होईल.
Christmas 2025 : नाताळ निमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना द्या ‘या’ खास भेटवस्तू

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. पारंपारिकपणे हा सण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा आवडीच्या लोकांसोबत सोजरा केला जातो. या सणानिमित्त केक, नवीन सजावट आणि काही खास भेटवस्तू गिफ्ट दिल्या जातात. तुम्हीही नाताळनिमित्त भेट वस्तू तुमच्या प्रियजणांना देत असाल तर आज आपण जाणून घेऊयात कोणत्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता…

ख्रिसमसमध्ये भेटवस्तू म्हणून या गोष्टी द्या

आरामदायी आणि उपयुक्त वस्तू

नाताळच्या निमित्ताने मित्रांना आरामदायी आणि उपयुक्त भेटवस्तू देण्यासाठी मऊ मोजे, ट्रॅव्हल मग हे उत्तम पर्याय आहेत. हिवाळ्यात वापरायला आरामदायक आणि मऊ मोजे मित्रांसाठी उपयोगी ठरतील.

हॉट चॉकलेट किंवा कॉफी गिफ्ट सेट

ख्रिसमसला मित्रांसाठी हॉट चॉकलेट आणि कॉफी गिफ्ट सेट उत्तम आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कॉफी किंवा हॉट चॉकलेटचे विविध प्रकार द्या. थंडीत गरम पेयांचा आनंद घेण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

पर्सनलाइज्ड गिफ्ट्स

मैत्रीचा एखादा खास फोटो असलेली फ्रेम किंवा मग द्या. वैयक्तिक स्पर्श असलेल्या भेटवस्तू नेहमीच खास असतात. तुमच्या मित्राचा किंवा तुमच्या दोघांचा एखादा खास फोटो असलेला मग किंवा फ्रेम भेट द्या. मित्राला लिहिण्याची आवड असल्यास नाव कोरलेले पेन किंवा डायरी उत्तम पर्याय आहे.

मिनी डेस्क प्लांट 

ख्रिसमसला मित्रांना देण्यासाठी मिनी डेस्क प्लांट हे एक उत्तम भेटवस्तू आहे, जे सकारात्मक ऊर्जा आणतात.

होम डेकोर

नाताळनिमित्त मित्रांसाठी तुम्ही छोटे ख्रिसमस ट्री, सजावटीच्या वस्तू, सुगंधित मेणबत्त्या, फोटो फ्रेम, यांसारख्या भेटवस्तू देऊ शकता, ज्यातून तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी आणि तुमच्या बजेटनुसार निवड करू शकता, ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल आणि हा सण अधिक खास बनेल.

ब्युटी बॉक्स

नाताळसाठी मित्रांना आणि मैत्रिणींना देण्यासाठी अनेक छान भेटवस्तू आहेत. मैत्रिणींसाठी ब्युटी प्रोडक्ट्सचा बॉक्स (स्किनकेअर, मेकअप), कस्टमाइज्ड ज्वेलरी, किंवा हँडी एक्सेसरीज (उदा. कीचेन) उत्तम पर्याय आहेत, जे बजेटमध्ये बसतील आणि आनंद देतील. मैत्रिणींसाठी विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा ब्युटी बॉक्स देता येईल.

डेस्कसाठी भेटवस्तू

ऑफिस किंवा स्टडी टेबलसाठी मिनी डेस्क प्लांट, डेस्क ऑर्गनायझर किंवा पेन स्टँड देऊ शकता. नाताळच्या निमित्ताने मित्रांसाठी मिनी डेस्क प्लांट, डेस्क ऑर्गनायझर किंवा पेन स्टँड हे उत्तम गिफ्ट पर्याय आहेत, जे त्यांच्या ऑफिस/स्टडी टेबलला सजवतील. छोट्या कुंड्यांमधील रोपे टेबलवर ताजेतवानेपणा आणतात. लाकडी किंवा आकर्षक डिझाइनचे पेन स्टँड टेबलला शोभा आणतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)