जगभरात ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला सगळे एकमेकांना भेटवस्तू देऊन दिवस आनंदात साजरा करतात. ख्रिसमस म्हटलं की, घराघरात केक, कुकीज, मिठाई आणि वेगवेगळे खास पदार्थ घरात बनत असतात. या दिवशी सुकामेवा आणि प्लम केक सुद्धा मोठ्या संख्येने खाण्याची पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया ख्रिसमस स्पेशल प्लम केकची रेसिपी….
साहित्य
- २ वाटी मैदा
- १ चमचा बेकिंग पावडर
- १ चमचा सोडा
- १ वाटी बदाम, काजू पिस्ता काप करून,मनुका,
- १/४ वाटी अॅपल तुकडे करून
- १ वाटी साखर
- १/४ वाटी आरेंज ज्यूस
- ३ व्हॅनीला इसेन्स
- १ पेला दूध
- १ चमचा सुंठ पावडर व जायफळ पूड अॅड
- थोडी चेरी तुकडे करून,टुटीफ्रुटी
- १/४ कप कोको पावडर
- 5 चमचे साखर
कृती
- प्रथम सर्व सुकामेवा व टुटीफ्रुटी,चेरी ऑरेंज ज्यूस मध्ये अर्धा तास भिजवून ठेवा .
- आता अॅपलचे बारिक तुकडे करून घ्या.
- पुढे पाच चमचे साखर पॅनमध्ये अॅड करून विरघळून घ्यावी.
- मग एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा अॅड करून त्यात सुंठ पावडर व जायफळ पावडर मिक्स करा.
- आता कोको पावडर त्यात अॅड करा. मग साखर टाकून मिक्स करा आणि दुध अॅड करून घ्या.
- आता उरलेले जिन्नस त्यात एकत्र करा. तुमचे मिश्रण तयार आहे.
- आता तुम्ही हवा त्या आकाराचा डबा घ्या. त्याला बटर किंवा तेल लावून घ्या.
- मग त्यात तयार बॅटर अॅड करा. हे तुम्ही गॅस, ओवन आणि कुकरमध्ये कशातही करू शकता.
- आता तो डबा झाकण लावून ४० मिनिटे मंद आचेवर ठेवू शकता.
- चला तुमचा प्लम केक तयार आहे. हा तुम्ही थंड झाल्यावर कापू शकता त्यावर तुम्ही हवी तशी डिजाईन सुद्धा तयार करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





