हिंदू धर्मात देवी-दैवतांची पूजा करताना देवाला नैवेद्य दाखवला जातो. देवाला नैवेद्य ठेवताना त्यात फळं, मिठाई, पंचपक्वान यांसारख्या गोष्टी अर्पण करतात. नैवेद्य दाखवताना काही चुका अजिबात करु नयेत. नैवेद्य दाखवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

नैवेद्य कशातून अर्पण करावा

देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य कोणत्या भांड्यातून दिला जात आहे, याला महत्त्व आहे. देवाला नैवेद्य दाखवताना प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांचा वापर टाळावा. नेहमी तांबे, पितळ, चांदी किंवा केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करावा.

नैवेद्य ताटात न ठेवणे

नैवेद्य दाखवल्यानंतर ५-१० मिनिटांनी ताट काढून तो प्रसाद कुटुंबात वाटावा. ताट देवघरात तसंच ठेवणं चुकीचं आहे, यामुळे पूजा पूर्ण होत नाही. नैवेद्य ताटात बराच वेळ राहिल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. नैवेद्य दाखवल्यावर तो बराच वेळ देवासमोर तसाच ठेवणे चुकीचे आहे. यामुळे घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो. देवाला अर्पण केलेला प्रसाद स्वतःकडे न ठेवता घरातील सर्वांना आणि गरजूंना वाटावा, असे केल्याने सुख-समृद्धी येते.

तुळशीचे पान

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, देवाला नैवेद्य दाखवताना ताटातील सर्व पदार्थांवर तुळशीपत्र ठेवणे अनिवार्य आहे, अन्यथा पूजा अपूर्ण मानली जाते. विष्णू, कृष्ण किंवा त्यांच्या अवतारांना नैवेद्य दाखवताना प्रत्येक पदार्थात तुळशीचे पान ठेवणे आवश्यक आहे, त्याशिवाय देव नैवेद्य स्वीकारत नाहीत.

मीठ आणि तिखट वर्ज्य

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यात मीठ, मिरची किंवा तिखट पदार्थांचा वापर टाळावा. केवळ सात्त्विक अन्न अर्पण करावे. देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या अन्नात मीठ, मिरची किंवा मसाले नसावेत, कारण असे अन्न तामसिक मानले जाते.

नैवेद्याचा अनादर होऊ नये

नैवेद्याचा कोणत्याही प्रकारे अनादर होणार नाही याची विशेष काळजी घ्या. नैवेद्य दाखवलेले अन्न शिळे होणार नाही याची काळजी घ्यावी. देवघरातील नैवेद्याच्या ताटात उष्टे अन्न ठेवू नये किंवा ताट तसे ठेवून विसरू नये. नैवेद्य दाखवलेला पदार्थ जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. 
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)