Kalashtami : आज मासीक कालाष्टमी अशी करा काल भैरवाची पुजा…

Published:
हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला 'कालाष्टमी' म्हणतात. भगवान शंकराचा रौद्र अवतार असलेल्या कालभैरवासाठी हा दिवस समर्पित आहे. त्यांना 'काशीचे कोतवाल' असेही म्हणतात.
Kalashtami : आज मासीक कालाष्टमी अशी करा काल भैरवाची पुजा…

कालाष्टमी म्हणजे दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी, जी भगवान शंकराच्या उग्र अवतार ‘कालभैरवा’ला समर्पित आहे; या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि संरक्षण मिळते. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात यश प्राप्त होते.

कालाष्टमी म्हणजे काय?

“काळ” म्हणजे वेळ आणि मृत्यू, आणि “भैरव” म्हणजे भयंकर. कालभैरव काळावर नियंत्रण ठेवणारे, वेळेचे आणि मृत्यूचे देवता आहेत.  प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असते. 

कालाष्टमी 2026 पूजेचा शुभ वेळ 

पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी सुरू होईल आणि 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत राहील. कालाष्टमीची पूजा निशिता काळात म्हणजेच मध्यरात्री करणे अधिक फलदायी मानले जाते. 10 जानेवारीच्या रात्री 11 वाजून 55 मिनिटांपासून ते 12 वाजून 46 मिनिटांपर्यंत काळभैरवाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं.

कालभैरव पूजा कशी करावी?

  • कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
  • पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी ते ठिकाण सजवा.
  • कालभैरवची मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवा.
  • कालभैरवाला गंगेच्या पाण्याने स्नान करून कालभैरवाला काळे तीळ, मोहरीचे तेल, काळी उडीद डाळ, लाल जास्वंद फुले, कापूर आणि धूप अर्पण करा.
  • मंत्र जप: ‘ॐ कालभैरवाय नमः’ किंवा ‘कालभैरव अष्टक’ आणि ‘भैरव चालीसा’चे पठण करा. हे अत्यंत फलदायी मानले जाते.
  • कालभैरवाला नैवेद्य दाखवा. तुम्ही नैवेद्य म्हणून फळे, मिठाई किंवा इतर नैवेद्यही ठेवू शकता.
  • शेवटी कालभैरवाची आरती करा.
  • काळया कुत्र्याला भाकरी खायला द्या कारण काळया कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानले जाते.
  • मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा.
  • जर कालभैरवाची मूर्ती नसेल, तर शिवपिंडीची पूजा करावी किंवा शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करावा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews