Spiritual : तुम्हीही ऑफिस बॅगमध्ये ‘या’ वस्तू ठेवताय? तुमच्या प्रगतीत येतील अडथळे…

Published:
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ऑफिसच्या बॅगेमध्ये काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. अशा काही गोष्टी ठेवल्यास करिअरच्या वाढीवर आणि कामातील सकारात्मकतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
Spiritual : तुम्हीही ऑफिस बॅगमध्ये ‘या’ वस्तू ठेवताय? तुमच्या प्रगतीत येतील अडथळे…

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रानुसार ऑफिसच्या बॅगेत काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. या वस्तूंमुळे कामात अडथळे येणे किंवा नकारात्मकता पसरू शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या तुम्ही ऑफिस बॅगमध्ये ठेऊ नयेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

खराब किंवा रिकामे पेन

चालत नसलेले किंवा खराब झालेले पेन नकारात्मकता निर्माण करतात. हे त्वरित काढून टाकावेत. पेन चालत नसेल तर ते कामात अडथळा दर्शवते, त्यामुळे ते त्वरित काढून टाका.

जुने व अनावश्यक कागदपत्रे/बिलं

कामाचे नसलेले जुने कागदपत्रे किंवा जुनी बिले बॅगेत साचवून ठेवल्याने करिअरच्या प्रगतीत अडथळे येतात. जुन्या पावत्या किंवा न वापरलेले कागदपत्रे करिअरमध्ये स्थिरता आणत नाहीत.

टोकाची किंवा धारदार हत्यारे

कात्री, सुरी किंवा इतर टोकदार वस्तू बॅगेत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. गरज असल्यास त्या कागदात गुंडाळून ठेवाव्यात. सुरी, कटर, कात्री, ब्लेड किंवा टोकदार पिन बॅगेत ठेवू नयेत. यामुळे कामात अडचणी येतात.  कात्री, चाकू किंवा सुईसारख्या धारदार वस्तू रागाचे आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जातात.

तुटलेले सामान

तुटलेली पेन्सिल, पेन किंवा बॅगेतील तुटलेली चेन नशिबावर परिणाम करू शकते. खराब झालेले इयरफोन्स, चार्जर किंवा फाटलेले पाकीट/बॅग नकारात्मक्ता आकर्षित करतात.

परफ्यूम आणि डिओडोरंट्स

परफ्यूम आणि डिओडोरंट्स हे थेट शरीराशी संबंधित असल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते. अति तीव्र गंधाचा परफ्यूमही काही वेळा मन विचलित करू शकतो.

घाणेरडे कपडे

वापरलेले रुमाल किंवा कपडे ठेवू नका, यामुळे करिअरमध्ये अडथळे येतात. वापरलेले कपडे किंवा रुमाल बॅगेत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. 

अस्वच्छता

बॅग नेहमी स्वच्छ ठेवावी, त्यात अडकलेले कचरा किंवा अनावश्यक गोष्टी करिअरमध्ये अडथळे निर्माण करतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews