Vastu Tips : पोळपाट लाटण्याशी संबंधित ‘या’ गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या…

Published:
वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये स्वयंपाक घरातील काही चुका तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान करु शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेली लाटणे ठेवल्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते.
Vastu Tips : पोळपाट लाटण्याशी संबंधित ‘या’ गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या…

वास्तूशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीचे नियम सांगण्यात आले आहेत. पोळपाट-लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील पोळपाट-लाटण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ते थेट लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. चुकीच्या पद्धतीने पोळपाट-लाटणं वापरल्यास वास्तुदोष निर्माण होतात? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

पोळपाट-लाटणं खरेदी

नवीन पोळपाट-लाटणे खरेदी करण्यासाठी बुधवारचा दिवस वास्तुशास्त्रात सर्वात चांगला मानला जातो. शक्यतो लाकडी पोळपाट-लाटणे खरेदी करावे. संगमरवरी  किंवा इतर धातूचे खरेदी करणे टाळावे. पोळपाट पूर्णपणे सपाट असावा, मधून खोलगट नसावा. लाटणे तुटलेले नसावे. लाकडी पोळपाट-लाटणे हे सुख आणि समृद्धीचे कारक मानले जाते.

कोणत्या दिवशी खरेदी करू नये

वास्तुशास्त्रानुसार पोळपाट-लाटणे शनिवार किंवा मंगळवारी खरेदी करू नये, यामुळे घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो.

स्वच्छता

पोळपाट-लाटणे नेहमी स्वच्छ ठेवावे, गलिच्छ किंवा जळलेले लाटणे वापरल्याने आरोग्यावर आणि नशिबावर वाईट परिणाम होतो. लाटण्याने पोळ्या लाटताना योग्य पद्धतीने वापर करा, ते घरातील सुबत्ता टिकवून ठेवण्यास मदत करते. पोळपाट-लाटणे वापरल्यानंतर ते नेहमी स्वच्छ करून ठेवावे, अस्वच्छतेमुळे घरात दारिद्र्य येते. पोळपाट लाटणे वापरून झाल्यावर ते स्वच्छ धुवून पुसून ठेवावे. ते घाणेरडे किंवा खराब स्थितीत ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात.

धान्यांच्या डब्ब्यावर ठेवू नका

पोळपाट-लाटण्याला कधीही अन्नधान्य किंवा पिठाच्या डब्याखाली किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. पोळपाट-लाटण्यामुळे घरातील अन्नाचा पुरवठा आणि समृद्धी जोडलेली असते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. काम झाल्यावर पोळपाट कधीही उलटं ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊन घरात दारिद्र्य येते. अनेकजण पोळ्या लाटून झाल्यावर पोळपाट-लाटणे धान्याच्या किंवा कणकेच्या डब्यावर ठेवतात, हे अत्यंत चुकीचे आहे.

तुटलेले पोळपाट

तडे गेलेले, तुटलेले किंवा लाटताना आवाज करणारे पोळपाट-लाटणे त्वरित बदलून टाकावे, अन्यथा घरात भांडणे आणि गरीबी येते. तुटलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. पोळपाट-लाटणे तडा गेलेले किंवा तुटलेले नसावे, अन्यथा घरात मोठ्या आर्थिक संकटासह कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात.

आवाज होऊ नये

वास्तुशास्त्रानुसार पोळपाट-लाटणे वापरताना ‘टकाटक’ असा आवाज येणार नाही याची खबरदारी घ्या, कारण असा आवाज घरगुती अशांती आणि आर्थिक नुकसान दर्शवतो. पोळपाट वापरताना त्यातून खूप आवाज येत असेल, तर ते बदलून घ्यावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)