Vastu Tips : दुकानासमोर चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू होईल आर्थिक नुकसान…

Published:
वास्तुशास्त्रानुसार दुकान समोर काही गोष्टी असल्यास व्यापार मंदावतो किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. दुकानासमोर नेहमी स्वच्छता, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे महत्त्वाचे आहे.
Vastu Tips : दुकानासमोर चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू होईल आर्थिक नुकसान…

आपला व्यवसाय चांगला चालावा, आपल्याला व्यवसायातून चांगला नफा मिळावा, दुकानात सतत ग्राहकांची गर्दी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, व्यवसाय चांगला चालण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

कचरा आणि अस्ताव्यस्तपणा

गटार, कचराकुंडी किंवा घाण दुकानाच्या समोर नसावी, कारण ती नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि व्यवसायाला हानी पोहोचवते. दुकानाच्या बाहेर किंवा आत अनावश्यक वस्तू, पसारा असू नये, ज्यामुळे आर्थिक अडथळे येतात. अस्वच्छता आणि पसारा नकारात्मक ऊर्जा वाढवतो, ज्यामुळे व्यवसायात अडथळे येतात. दुकानाच्या प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा (उदा. कचरा, अनावश्यक वस्तू) नसावा, जागा मोकळी आणि स्वच्छ असावी. 

तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू

तुटलेले फर्निचर, मोडके खेळणी किंवा इतर खराब झालेल्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे व्यवसायात अडथळे येतात. तुटलेले आरसे, इलेक्ट्रॉनिक वस्तू (फ्यूज बल्ब, खराब चार्जर),. तुटलेल्या मूर्ती, आणि बंद घड्याळे नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि आर्थिक त्रास देतात

काटेरी किंवा विषारी झाडे

निवडुंग सारखी काटेरी झाडे किंवा विषारी वनस्पती दुकानासमोर ठेवणे टाळावे. काटेरी/विषारी झाडे निवडुंग आणि दूध येणारी झाडे नकारात्मक ऊर्जा आणतात, ज्यामुळे घरात किंवा दुकानात तणाव आणि असंतुलन निर्माण होते.  मेलेली झाडे घरात किंवा दुकानात नकारात्मकता पसरवतात, त्यामुळे ती त्वरित काढून टाकावीत. 

बंद पडलेली उपकरणे

बंद पडलेली मशिनरी किंवा इतर उपकरणे दुकानासमोर ठेवू नयेत, यामुळे कामात अडथळे येतात. तुटलेली घड्याळे किंवा इतर बंद पडलेली उपकरणे नकारात्मक ऊर्जा आणतात आणि आर्थिक प्रगतीत अडथळा आणतात. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

उभ्या असलेल्या भिंती किंवा विजेचा खांब

दुकानाच्या प्रवेशद्वारासमोर थेट मोठा खांब किंवा भिंत नसावी, यामुळे ग्राहकांना आत येण्यास अडथळा निर्माण होतो. दुकानाच्या प्रवेशद्वारासमोर भिंत, विजेचे खांब किंवा होर्डिंगचे खांब असल्यास ऊर्जा अडते आणि सकारात्मक प्रवाह थांबतो. विजेचा खांब दुकानासमोर असल्यास नकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होतो.

अस्ताव्यस्त केलेले पार्किंग/सामान

दुकानासमोर सामान किंवा गाड्यांची अस्ताव्यस्त मांडणी नसावी, ज्यामुळे मार्ग अडतो आणि नकारात्मकता येते.

तीव्र उतार

दुकानासमोर तीव्र उतार असणे वास्तुदोष मानला जातो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि यश मिळत नाही. दुकानासमोर तीव्र उतार असल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि पैसे हातात टिकत नाहीत.

अंधार

प्रवेशद्वाराजवळ किंवा दुकानाच्या बाहेर अंधार असल्यास धन-समृद्धी थांबते, म्हणून पुरेसा प्रकाश असावा. दुकान अंधाऱ्या भागात नसावे, कारण यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते आणि पैसा हातात राहत नाही.

तिजोरी

तुमच्या दुकानातील तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेला ठेवा, कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा असते, तसेच ती धनाचे देवता कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे, त्यामुळे सदैव तुमची तिजोरी पैशांनी भरलेली राहीलं.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)