Astro Tips : अंघोळ न करता करू नका ही कामे, अन्यथा…

Published:
अंघोळ न करता ही कामे केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते, असे मानले जाते. शुद्ध शरीर हे शुद्ध मनाचे प्रतीक आहे, त्यामुळे या गोष्टींचे पालन केल्याने आरोग्य आणि सकारात्मकता वाढते.
Astro Tips : अंघोळ न करता करू नका ही कामे, अन्यथा…

हिंदू धर्मात स्नान हे केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी नसून मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठीही महत्त्वाचे मानले जाते. अंघोळ केल्याने शरीरावरील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. आंघोळ करणं ही एक फक्त शरीर स्वच्छ करण्याची क्रियाच नाही तर त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहतात, तुमचा तणाव दूर होतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार, अंघोळ न करता काही महत्त्वाची कामे टाळावी लागतात, कोणती आहेत ती कामे जाणून घेऊयात…

पूजा-पाठ आणि धार्मिक विधी

अंघोळ न करता देवघरात प्रवेश करणे किंवा पूजा करणे टाळावे, असे सांगितले जाते. शरीराची शुद्धता महत्त्वाची आहे. स्वच्छ अंघोळ केल्याने मन शुद्ध होते, त्यामुळे देवाची पूजा करण्यापूर्वी अंघोळ करणे आवश्यक आहे. कोणत्याही शुभ कार्याप्रमाणेच, अंघोळ न करता पूजा करणे निषिद्ध आहे, ज्यामुळे पूजा फळत नाही आणि नकारात्मक परिणाम होतात.

स्वयंपाकघरात प्रवेश

अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जाणे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते, कारण स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जास्थान आहे आणि अशुद्धतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. अंघोळ न करता स्वयंपाकघरात जाणे किंवा इतर कामे करणे यामुळे घरात अशांतता, आजारपण आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.

तुळशीला पाणी घालणे

सकाळी अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालू नये, कारण ते अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, अंघोळ न करता तुळशीला स्पर्श करणे, पाने तोडणे किंवा पाणी घालणे टाळावे, कारण तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि अशुद्ध मनाने स्पर्श करणे अशुभ मानले जाते. या कामांसाठी नेहमी स्नान करून स्वच्छ कपडे घालूनच पूजा करावी, असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

अन्न सेवन

अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये, कारण हे अशुद्ध मानले जाते आणि आरोग्यावर वाईट परिणाम करते.

पैशांना स्पर्श

अंघोळ केल्याशिवाय पैशांना हात लावू नये. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मी रुसते आणि कामांमध्ये अडथळे येतात, त्यामुळे सकाळी अंघोळ करून शुद्ध मनानेच ही कामे करावीत.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews