Marathi News

Lord Shiva : घरात भगवान शंकराचा फोटो लावताना करू नका ‘या’ चूका

Published:
घरात शांत व प्रसन्न रूपातील शंकरजीची पूजा केल्यास नकारात्मता नष्ट होऊन सुख-समृद्धी येते. भगवान शिव शंकर भस्मात रुद्रावतारामध्ये असतानाचा फोटो घरात लावणे टाळा.
Lord Shiva : घरात भगवान शंकराचा फोटो लावताना करू नका ‘या’ चूका

वास्तुशास्त्रात देवतांचे फोटो लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. वास्तु नियमानुसार शंकराची मूर्ती/फोटो स्थापित केल्यास शुभ फळ प्राप्त होतात.  घरामध्ये भगवान शंकराचा फोटो लावणे शुभ असते. पण, वास्तुशास्त्रात फोटो लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…..

क्रोधीत फोटो टाळा

शिवशंकराचा रुद्रावतार, तांडव करणारा किंवा रागवलेला फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात शिवशंकराचा रागवलेला, तांडव करणारा किंवा रुद्रावतार फोटो लावणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा चित्रांमुळे घरातील शांती, सुख आणि समृद्धी नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते. भगवान शंकराची रुद्रावतार किंवा क्रोधीत प्रतिमा नकारात्मकता आणि घरात कलह वाढवू शकते.

उभा फोटो नसावा

शिवशंकराची उभी मूर्ती किंवा चित्र घरात लावणे टाळावे. यामुळे घरात सुख-शांती राहत नाही. भगवान शिवाची उभी असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने आर्थिक अडथळे येऊ शकतात. 

योग्य दिशा

महादेवाचे निवासस्थान कैलास पर्वत उत्तरेला असल्याने, शिवप्रतिमा उत्तर दिशेला लावणे सर्वोत्तम आहे. शिवशंकराचा फोटो दक्षिण दिशेला लावणे टाळा. कैलास पर्वत उत्तरेला असल्याने उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते.

ध्यानस्थ मुद्रा उत्तम

सुख-समृद्धीसाठी प्रसन्न, हसतमुख किंवा ध्यानस्थ मुद्रेतील महादेवाचा फोटो लावावा. भगवान शिव ध्यानमग्न अवस्थेत असतील, असा फोटो घरासाठी शुभ असतो, कारण ते शांततेचे प्रतीक आहेत. 

शिव परिवार

कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी शिव, पार्वती आणि गणेशासह संपूर्ण कुटुंबाचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात शिव-पार्वतीचे एकत्रित फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे कौटुंबिक शांतता टिकून राहते.

स्वच्छता

ज्या ठिकाणी फोटो लावता, ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी, तिथे पावित्र्य पाळावे. महादेवाचा फोटो किंवा मूर्ती असलेली जागा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावी. जिथे स्वच्छता नाही किंवा पायऱ्यांखाली, बाथरुमच्या भिंतीवर, शयनकक्षात (बेडरूम) फोटो लावू नका.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews