Vastu Shastra : सुकलेली तुळस देते ‘या’ संकटांचे संकेत, जाणून घ्या…

Published:
वाळलेली तुळस हे घरात नकारात्मक उर्जा, आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येण्याचे संकेत देते.
Vastu Shastra : सुकलेली तुळस देते ‘या’ संकटांचे संकेत, जाणून घ्या…

हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर तिला ‘साक्षात लक्ष्मी’चे रूप मानले जाते. ज्या घरात तुळस हिरवीगार आणि टवटवीत असते, तिथे सुख-समृद्धी नांदते. शास्त्रानुसार जर तुमच्या घरातील तुळस खूप काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल, तर ते भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा घरावरील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

घरातील नकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत तुळशीचे रोप सुकणे हे नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत मानले जाते. तुळस घरातील नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते, त्यामुळे ती वाळते.  घरात नकारात्मक शक्तीचा संचार वाढला आहे किंवा कुणीतरी वाईट नजर लावली आहे.

बुध ग्रहाचा प्रभाव

ज्योतिषशास्त्रात तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे. बुध कमकुवत असेल तर तुळस सुकते, ज्यामुळे बौद्धिक नुकसान आणि व्यवसायात तोटा होऊ शकतो.

भयंकर संकटाचे संकेत

वाळलेली तुळस सूचित करते की कुटुंबावर आर्थिक, शारीरिक किंवा कौटुंबिक समस्या येणार आहेत. याला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा ‘बळी’ मानले जाते.

वारंवार तुळस सुकू नये म्हणून करा ‘हे’ उपाय

  • तुळशीच्या कुंडीजवळ झाडू, चपला किंवा घाण वस्तू ठेवू नका.
  • तुळशीला दररोज पाणी द्या, पण जास्त पाणी देऊ नका, अन्यथा मुळे कुजतात.
  • एकादशी आणि रविवारी तुळशीला जल (पाणी) अर्पण करू नये, या दिवशी तुळशीची पूजा करावी पण पाणी घालू नये.
  • सुकलेली तुळस काढून टाकून त्या जागी गुरुवारी नवीन तुळशीचे रोप लावा. जुनी तुळस वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी.
  • दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून “शुभं करोति कल्याणं…” हा मंत्र म्हणावा.
  • तुळशीला अस्वच्छ किंवा खरकटे पाणी घालू नका. तुळशीच्या कुंडीत काचेचे तुकडे किंवा लोखंडी वस्तू ठेवू नका.
  • दररोज तुळशीची पूजा करा, तिला जल अर्पण करा, जेणेकरून घरातील सुख-समृद्धी कायम राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews