गरुड पुराणात मृत्यू आणि त्यापूर्वी घडणाऱ्या घटनांबद्दल सांगण्यात आलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जीवनाचा अखेरचा घटका मोजत असतो, तेव्हा त्याला कोणत्या गोष्टी दिसतात आणि कोणत्या गोष्टी ऐकू येतात, याबद्दल गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
पूर्वजांचे दर्शन
मृत्यूपूर्वी व्यक्तीला त्याच्या पितरांचे (पूर्वजांचे) दर्शन होते, असे मानले जाते. मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीला आधीच मरण पावलेले पूर्वज किंवा नातेवाईक दिसू लागतात, जणू ते त्यांना न्यायला आले आहेत. मरणासन्न व्यक्तीला आपले मृत नातेवाईक किंवा पूर्वज समोर उभे असल्याचे दिसते. मृत पूर्वज किंवा नातेवाईक आसपास असल्याचा भास होतो.
यमराजाचे दूत
मृत्यूच्या एक तास आधी, व्यक्तीला यमराजाचे दूत आपल्या जवळ असल्याचे जाणवते. मृत्यूच्या एका तासापूर्वी व्यक्तीला यमराजाचे दूत आपल्या आसपास घिरट्या घालत असल्याचे जाणवते. मृत व्यक्तीला यमदूत किंवा त्यांच्यासोबत दोन भयंकर आकृत्या दिसू लागतात.
मरणापूर्वी दिसू लागतं रहस्यमयी दार
एका रहस्यमय दरवाजातून पांढरा प्रकाश किंवा आगीचे लोट दिसतात, ज्याला यमलोकाचे द्वार मानले जाते. पापकर्माचे फल म्हणून व्यक्तीला आगीचे लोट किंवा गडद अंधार दिसू शकतो.
चांगले-वाईट कर्म आठवू लागतात
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला त्याचे चांगले आणि वाईट कर्म दिसू लागतात. आयुष्यातील सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांची आठवण किंवा दृश्ये समोर येऊ लागतात. हे संकेत अंतिम क्षणापूर्वी व्यक्तीला त्याच्या कर्मांची जाणीव करून देतात, असे गरुड पुराणात वर्णन केले आहे.
अंधार आणि सावली
आरशात, पाण्यात किंवा तेलात स्वतःची सावली न दिसणे किंवा विकृत दिसणे हा मृत्यूचा मोठा संकेत मानला जातो. व्यक्तीला स्वतःच्या आजूबाजूला खूप जास्त अंधार दिसू लागतो, किंवा काही प्रकरणांमध्ये खूप मोठा प्रकाशाचा लोळ दिसतो. सर्व काही असूनही डोळ्यांसमोर अंधार दाटून येतो. व्यक्तीला स्वतःची सावली दिसत नाही किंवा सावली वेगळी (धड नसलेली) दिसू शकते. आरसा, पाणी किंवा तेलात स्वतःचा चेहरा किंवा प्रतिबिंब दिसत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






