Marathi News

Hanuman Chalisa : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

Published:
हनुमान चालीसा ही कवी तुलसीदास यांनी लिहिली होती, शास्त्रात तिचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की याचा जप केल्याने शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते.
Hanuman Chalisa : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याचे सर्व संकट दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणते फायदे होतात…

नकारात्मक ऊर्जा नष्ट

घरातील वास्तुदोष किंवा अशुभ शक्तींचा प्रभाव कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार दररोज हनुमान चालीसा म्हणणे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. हनुमान चालीसाच्या नियमित पाठाने घरातील वाईट शक्ती, वास्तू दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

भीतीपासून मुक्ती

हनुमानजींना ‘संकटमोचन’ मानले जाते, त्यामुळे भीती आणि अनिश्चितता दूर होते. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा म्हणल्याने भीती वाटते आणि मानसिक शांती मिळते. रोज रात्री हनुमान चालीसा ऐकवल्याने मुलांना झोपेत भीती वाटत नाही. घरातील भीती, अज्ञात चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.

आत्मविश्वास व मानसिक शांती

दररोजच्या पठणाने मनात शांतता राहते आणि आत्मविश्वासात वाढ होते.  दररोज पाठ केल्याने मनोबल वाढते आणि संकटांशी लढण्याची ताकद मिळते. नियमित वाचनाने मानसिक ताकद वाढते, ज्यामुळे कामात यश मिळते. दररोजच्या पठणामुळे मानसिक ताण कमी होऊन एकाग्रता वाढते.

ग्रहदोषांपासून संरक्षण

हनुमान चालीसा पठणाने पितृदोष, राहू-केतू दोष आणि शनीचा त्रास कमी होतो. साडेसाती, शनीची महादशा किंवा राहू-केतू दोष असल्यास हनुमान चालीसाचे वाचन करणे फायदेशीर ठरते. हनुमानजींच्या पूजेने शनी, मंगळ, आणि राहू-केतू दोष दूर होण्यास मदत होते.

आरोग्य आणि बुद्धी

हे शरीर निरोगी ठेवते आणि स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढवते. हनुमानजींच्या आशीर्वादाने जुनाट आजार आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते. 

कामातील अडथळे दूर

नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होऊन कामात यश मिळते. नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी, आर्थिक संकट आणि भीती दूर होते. वास्तुशास्त्रानुसार हनुमान चालीसा दररोज म्हणण्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते आणि कामातील अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग मोकळा होतो. हनुमान चालीसा पठणामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती तीव्र होते आणि कामामध्ये यश मिळते.

हनुमान चालिसाचे पठण करण्याची योग्य वेळ कोणती?.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे भय, नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक संकटे दूर करते, आत्मविश्वास वाढवते आणि आरोग्यदायी जीवन देते. ब्रह्ममुहूर्तावर ( पहाटे) किंवा संध्याकाळी अंघोळीनंतर हे पठण करणे उत्तम मानले जाते. सकाळच्या वेळी अंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करून पठण सुरू करा. संध्याकाळच्या वेळी हात-पाय धुवून स्वच्छतेने पाठ करावा. मंगळवार आणि शनिवार विशेष मानले जातात, परंतु दररोज करणे अधिक प्रभावी आहे . घराच्या देवघरात किंवा हनुमानजींच्या मंदिरात, स्वच्छ जागी आसन टाकून पाठ करावा. हनुमान चालिसा म्हणताना मन शांत आणि पवित्र असावे. हनुमान चालिसाचे नियमीत पठण केल्याने व्यक्तीला भयमुक्त, आरोग्यदायी आणि यशदायी जीवन जगण्यास मदत मिळते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews