Marathi News

Narmada River : नर्मदा नदीची उत्पत्ती कशी झाली ? वाचा यामागील पौराणिक कथा…

Published:
भारतातील बहुतांश मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात, परंतु नर्मदा एकमेव मोठी नदी आहे जी खचदरीतून (Rift Valley) पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला (गुजरात) मिळते.
Narmada River : नर्मदा नदीची उत्पत्ती कशी झाली ? वाचा यामागील पौराणिक कथा…

भारतातील नद्यांमध्ये नर्मदा नदीला एक विशेष आणि पवित्र स्थान आहे. गंगा स्नानाने पाप नष्ट होतात, तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पाप मुक्ती मिळते. नर्मदा परिक्रमा याबद्दल आपण नक्कीच ऐकलं असेल. अशी ही पवित्र नर्मदा नदी तिची उत्पत्ती कशी झाली आणि तिला पवित्र का मानले जाते? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

नर्मदा नदीची अवतार कथा

आख्यायिकेनुसार, भगवान शिव जेव्हा मैकल पर्वतावर (अमरकंटक) ध्यानस्थ असताना त्यांच्या शरीरातून निर्माण झालेला घाम कुंडात जमा झाला आणि त्यातून नर्मदेचा प्रवाह सुरू झाला. म्हणूनच तिला ‘शिवपुत्री’ किंवा ‘रेवा’ म्हणूनही संबोधले जाते. नर्मदा नदी खडकाळ प्रदेशातून उड्या मारत (रेव) वाहते, म्हणून तिला ‘रेवा’ असेही म्हणतात. असे मानले जाते की नर्मदा नदीमधील प्रत्येक खडा हा शिवलिंगाचे रूप आहे.

नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहते?

नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील दोन मोठ्या राज्यांची मुख्य नदी आहे.

नर्मदा नदी विरुद्ध दिशेला का वाहते?

पौराणिक कथेनुसार, नर्मदा नदीचे लग्न सोनभद्र नावाच्या नदाशी (नदीचा पुरुष प्रकार) ठरले होते. मात्र, एका गैरसमजामुळे आणि सोनभद्रने जोहिला नावाच्या दासीशी नाते जोडल्यामुळे, दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि याचा राग आल्याने नर्मदेने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आणि ती विवाहासाठी न जाता उलट दिशेने वाहून थेट अरबी समुद्राला (पश्चिमेकडे) जाऊन मिळाली. म्हणून रागावलेली नर्मदा उलट दिशेने वाहू लागली. नर्मदेने प्रवाहाविरुद्ध वाहून जाण्याचा निर्णय घेतला.

नर्मदा नदीचे महत्त्व

गंगा-यमुनेप्रमाणेच नर्मदा अत्यंत पवित्र मानली जाते. ‘नर्मदा प्रदक्षिणा’ (नदीच्या काठाने पायी यात्रा) करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. नर्मदा ही भारतातील सर्वात प्राचीन पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते, जिच्या केवळ दर्शनाने ७ पिढ्यांचा उद्धार होतो अशी श्रद्धा आहे. तिची परिक्रमा (प्रदक्षिणा) करणे हे सर्वोच्च पुण्य मानले जाते, जी जगातील एकमेव नदी परिक्रमा आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews