Vastu Tips : घरात भगवान बुद्धांची मूर्ती ठेवत असाल तर ‘हे’ नियम लक्षात ठेवा…

Published:
घरात भगवान बुद्धाची मूर्ती ठेवणे हे आपल्यासाठी फायदेशीर असते. वास्तूशास्त्रानुसार, आपण घरात गौतम बुद्धाची मूर्ती ठेऊ शकतो, परंतु ती योग्य दिशेला ठेवणे आवश्यक असते.
Vastu Tips : घरात भगवान बुद्धांची मूर्ती ठेवत असाल तर ‘हे’ नियम लक्षात ठेवा…

अनेक लोक शांतीसाठी आपल्या घरात, ध्यानावस्थेत असलेल्या भगवान बुद्धांचा फोटो किंवा मूर्ती ठेवतात. तुम्ही घरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती ठेवत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात..

घरात बुद्धांची मूर्ती ठेवल्याने काय होते?

वास्तुशास्त्रानुसार घरात बुद्धांची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा, शांती, समृद्धी आणि सौभाग्य येते, ज्यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते, वास्तुदोष दूर होतात, तसेच कुटुंबामध्ये सुसंवाद वाढतो. योग्य ठिकाणी ठेवलेली बुद्धांची मूर्ती घरात शांतता आणते आणि अडथळे दूर करते, तर चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा व जागा

मुख्य दरवाजाजवळ 

ध्यानस्थ बुद्धांची मूर्ती किंवा फोटो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतात, ज्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि आध्यात्मिक उन्नती होते. ध्यानावस्थेतील मूर्ती घरात शांतता आणते आणि ध्यानधारणेसाठी प्रेरणा देते. 

बुद्ध मूर्ती किंवा फोटो जमिनीवर ठेवू नका

बुद्धाची मूर्ती किंवा फोटो घरात उंच ठिकाणी ठेवावेत. मूर्ती जमिनीवर न ठेवता टेबल, शेल्फ किंवा उंच ठिकाणी ठेवावी. जमिनीवर ठेवणे टाळावे, कारण ते बुद्धांचा अनादर मानले जाते. योग्य दिशेचा विचार करून आणि जमिनीपासून उंच ठिकाणी ठेवल्यास बुद्धांची मूर्ती घरात सुख, शांती आणि सकारात्मकता आणते, असे वास्तुशास्त्र सांगते. 

घरातील पश्चिम दिशेला ठेवा

बुद्धाची मूर्ती घरातील पश्चिम दिशेला ठेवावी. असं केल्यानं घरात सुख-शांती राहते. घरातील देवघरात बुद्धाची मूर्ती ठेवल्यास ती पूर्वेकडे तोंड करून ठेवावी. घरात आनंद आणि चांगले नशीब आणण्यासाठी मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवावी.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews