जर तुम्ही घरातील भांडणामुळे त्रस्त असाल तर काही वास्तु उपाय अवश्य करा. हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुख-शांती मिळते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

हनुमान चालीसा पठण

वास्तुशास्त्रानुसार घरातील कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करावी आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा पाठ करा, यामुळे घरातील भांडणे आणि वास्तुदोष झटक्यात दूर होतात. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरातील संघर्ष कमी होतात.

स्वच्छता आणि कापूर जाळा

घर नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. घरात सतत भांडणे होत असल्यास, घराच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपऱ्यात मंद प्रकाश ठेवा. घर नेहमी स्वच्छ ठेवा.

बेडखालची जागा

बेडखाली कधीही जुने कपडे, भंगार किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नका. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो.  ही जागा नेहमी स्वच्छ ठेवा, अन्यथा पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात.

दक्षिण दिशा बंद ठेवा

घराची दक्षिण दिशा मोकळी ठेवू नये. यामुळे आजारपण वाढते.  दक्षिण दिशा मोकळी असणं हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते, त्यामुळे ती मोकळी ठेवू नका. या दिशेला जड वस्तू किंवा बंद ठेवा. दक्षिण दिशेला बेड ठेवू नका, यामुळे पितृदोष आणि आजारपण येते. तसेच, दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका.

घरात अंधार नसावा

वास्तुशास्त्रात घरात अंधार असणे अशुभ मानले जाते. घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असावी, यामुळे नकारात्मकता दूर होते.

तुरटीचा वापर

घरात कलह असल्यास, काचेच्या भांड्यात तुरटी ठेवून ती दर महिन्याला किंवा दर मंगळवारी बदलावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

मीठ आणि कापूर पाणी

दररोज लादी पुसताना पाण्यात थोडे सैंधव मीठ (खडे मीठ) आणि कापूर टाकून पुसल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)