Marathi News

Tulasi Plant : तुळशीचे रोप भेट म्हणून देणे शुभ कि अशुभ? जाणून घ्या…

Published:
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते.
Tulasi Plant : तुळशीचे रोप भेट म्हणून देणे शुभ कि अशुभ? जाणून घ्या…

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानलं जातं. घरात तुळस लावल्यानं घरात समृद्धी येते. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी निवास करते. तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे योग्य आहे की नाही? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

तुळशीचे रोप भेट देणे योग्य आहे की नाही?

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप भेट म्हणून देणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते भाग्य, सकारात्मकता आणि समृद्धी आणते. ही एक उत्तम भेट मानली जाते. तुळशीला पवित्र आणि देवस्वरूप मानले जात असल्याने, हे रोप भेट देणे नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे भेट दिलेले रोप वास्तूनुसार सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य आणण्यास मदत करते. परंतु भेट देताना किंवा लावताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरणार नाही.

तुळशी भेट देताना आणि लावताना घ्यायची काळजी

  • तुळशीचे रोप भेट देणे हे समृद्धीचे लक्षण आहे, जर ती योग्य दिशेला आणि नियमांचे पालन करून लावली तरच शुभ फळ मिळते. 
  • तुळशीचे रोप भेट देण्यासाठी गुरुवारी किंवा शुक्रवारी अत्यंत शुभ मानले जाते.
  • शनिवारी तुळस लावणे किंवा भेट देणे टाळावे, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
  • तुळशीचे रोप घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे. दक्षिण किंवा आग्नेय दिशेला लावू नये.
  • तुळशीसाठी चौकोनी कुंडी सर्वोत्तम मानली जाते.
  • तुळशीच्या जवळ चप्पल, कचराकुंडी किंवा इतर काटेरी झाडे ठेवू नका.
  • तुळशीच्या रोपाभोवती घाण किंवा कचराकुंडी ठेवू नये.
  • रोप सुकलेले नसावे आणि त्यावर रोज पाणी (रविवाऱ्या वगळून) अर्पण करावे.
  • सुकलेली तुळस घरात ठेवू नका, ती पवित्र नदीत प्रवाहित करावी किंवा मातीत गाडून टाकावी.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews