माघ महिना अत्यंत पुण्यपूर्ण मानला गेला आहे. या महिन्यात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
जया एकादशीचे महत्त्व
माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी जया एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असून ती पापांचे निर्मूलन, मोक्ष आणि आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास, विष्णू पूजा आणि तीळ दान केल्याने भक्ताच्या संकटांचे निवारण होते. ही एकादशी व्रत, दान आणि भक्तीद्वारे मन शुद्धीसाठी खास ओळखली जाते. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते. आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांना भुत-पिशाच योनीतून मुक्ती मिळते व पितृदोष दूर होतो. हे व्रत वैकुंठ प्राप्ती आणि दुःखातून मुक्ती देते..संततीची इच्छा असणाऱ्यांसाठी या दिवशीची पूजा फलदायी असते.
कधी आहे जया एकादशी?
पंचांगानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. आणि 29 जानेवारी रोजी 2026 पहाटे 1 वाजून 56 मिनिटांनी संपेल. एकादशीचे व्रत उदय तिथीनुसार गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी केले जाईल.
जया एकादशी पूजा पद्धत
- एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे.
- स्वच्छ वस्त्र परिधान करून हातात पाणी आणि फुले घेऊन उपवासाचा संकल्प करावा.
- भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृत, फुले, नैवेद्य (फळे), नारळ, सुपारी आणि विशेषतः तुळशी अर्पण करावी.
- ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा
- जया एकादशीची व्रत कथा वाचावी.
- कापूर लावून भगवान विष्णूची आरती करावी.
- उपवास करताना फलाहार घ्यावा, धान्याचे सेवन टाळावे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






